शिक्षण मंत्रालय

शालेय विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक शिक्षण आणि करिअर मार्गदर्शनाची पुनर्कल्पना या विषयावर शिक्षण मंत्रालयाची एक दिवसाची सल्लामसलत कार्यशाळा

Posted On: 18 DEC 2022 4:23PM by PIB Mumbai

 

शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव  संजय कुमार यांनी कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय, प्रशिक्षण महासंचालनालय (ITI), पीएसएससीआयव्हीई (PSSCIVE), भोपाळ, एनसीईआरटी(NCERT), सीबीएसई (CBSE), एनसीव्हीईटी (NCVET), एआयसीटीई (AICTE) या संस्थांशी  संबंधित सल्लामसलत कार्यशाळेचे आणि दोन गोलमेज परिषदेचे अध्यक्षस्थान भूषविले. या कार्यशाळा आणि गोलमेज परिषदेला पीडब्ल्यूसी (PwC), युवाह (YuWaah), नागरी संस्था संघटना, राज्य शिक्षण विभाग, व्यावसायिक शिक्षण आणि करिअर समुपदेशन, कॉर्पोरेट्स आणि विद्यमान आणि उत्तीर्ण विद्यार्थी आणि या क्षेत्रात काम करणारे व्यावसायिक आणि संस्थांचे विविध तज्ञ/प्रतिनिधि देखील उपस्थित होते.

WhatsApp Image 2022-12-17 at 8.24.57 PM (1).jpeg

WhatsApp Image 2022-12-17 at 8.25.53 PM (1).jpeg

 

आपल्या भाषणादरम्यान, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव, संजय कुमार यांनी निदर्शनास आणून दिले कीशाळांमध्ये औपचारिक व्यावसायिक प्रशिक्षणाद्वारे कामगारांना कुशल बनवण्याच्या बाबतीत भारताने इतर देशांचे अनुकरण करण्याची गरज आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण(NEP) 2020 मध्ये अशा समस्या ओळखून  त्यावर उपाय सुचवले आहेत, असेही ते म्हणाले.

WhatsApp Image 2022-12-17 at 8.24.57 PM.jpeg

WhatsApp Image 2022-12-17 at 8.25.39 PM.jpeg

सचिव कुमार यांनी निदर्शनास आणून दिले की, राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP), 2020 नुसार पुढील दशकात व्यावसायिक शिक्षण टप्प्याटप्प्याने सर्व शाळा आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे. कौशल्य शिक्षणातल्या त्रुटींचे विश्लेषण करून आणि उपलब्ध स्थानिक संधी यावर आधारित अभ्यासक्रम निवडले जातील जेणेकरून त्यांची मागणी वाढेल. व्यावसायिक शिक्षणाबाबत असलेल्या धारणा पासून मुक्त करण्यासाठी आणि त्या महत्त्वाकांक्षी बनवण्यासाठी सर्व संबंधितांकडून एकत्रित प्रयत्न होणे आवश्यक आहे.

WhatsApp Image 2022-12-17 at 8.25.38 PM.jpeg

शाळांमधील करिअर समुपदेशनाची सध्याची प्रणाली आणि मुख्य शिक्षण आणि सर्वोत्तम पद्धती नेमकी काय आहेत यावरही या दुसऱ्या गोलमेज परिषदेत चर्चा करण्यात आली.

***

S.Kane/V.Yadav/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1884567) Visitor Counter : 430