राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय सांख्यिकी सेवेच्या प्रशिक्षणार्थी उमेदवारांनी घेतली राष्ट्रपतींची भेट


सध्याच्या निरंतर माहिती आणि माहितीओघाच्या युगात सांख्यिकीची भूमिका आणि महत्त्व प्रचंड वाढले आहे - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Posted On: 16 DEC 2022 5:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 डिसेंबर 2022

भारतीय सांख्यिकी सेवेच्या प्रशिक्षणार्थी उमेदवारांनी आज (16 डिसेंबर 2022) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची, नवी दिल्ली येथे  राष्ट्रपती भवनात भेट घेतली.

या अधिकाऱ्यांना राष्ट्रपतींनी संबोधित केले. योग्य सांख्यिकीय विश्लेषणाशिवाय धोरणांची आखणी आणि प्रभावी अंमलबजावणी करणे शक्य होत नाही असे राष्ट्रपतींनी त्यांना सांगितले. सध्याचे युग हे निरंतर माहिती आणि माहितीओघाचे  आहे, अशा युगात सांख्यिकीची भूमिका आणि  महत्त्व प्रचंड वाढले आहे. जेव्हा आपण  मापदंडाच्या आधारे भारताच्या क्रमवारीचा विचार करतो तेव्हा तो  सांख्यिकीच्या  आधारे करतो, असे त्या म्हणाल्या. जेव्हा केव्हा आपण म्हणतो की, भारत हा तरुणांचा देश आहे किंवा लोकसंख्याशास्त्रीय पातळीवर भारत लाभाच्या स्थितीत आहे, तेव्हा या वक्तव्याचा आधार ही सांख्यिकच असते असे त्यांनी अधोरेखित केले.

अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे आणि बांधिलकी दाखवत आपली कर्तव्ये पार पाडायला हवीत, असे आवाहन राष्ट्रपतींनी केले. भारताची आणखी  प्रगती होण्यासाठी तसेच भारताची विकासाच्या दिशेने अधिक वेगाने वाटचाल होण्यासाठी सांख्यिकी अधिकाऱ्यांच्या मोठ्या योगदानाची आवश्यकता असल्याचेही राष्ट्रपतींनी नमूद केले. विकासाच्या दिशेने वाटचाल करताना कोणीही मागे पडणार नाही याची सुनिश्चिती करतील अशा धोरणांच्या आखणी आणि अंमलबजावणीत, या विभागाचे अधिकारी जो माहितीसाठा आणि माहितीसाठ्याचे विश्लेषण पुरवतात त्याची, अत्यंत महत्वाची भूमिका असते असेही राष्ट्रपतींनी यावेळी अधोरेखित केले.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

 

 

S.Kakade/T.Pawar/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1884207) Visitor Counter : 195