विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
टीडीबी -डीएसटीने प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय तंत्रज्ञान पुरस्कार, 2023 साठी अर्ज मागवले
Posted On:
16 DEC 2022 9:45AM by PIB Mumbai
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
11 मे 1998 रोजी भारतीय लष्कराच्या पोखरण रेंजवर भारताने अणु चाचणी यशस्वीपणे पार पाडून अभिमानास्पद कामगिरी केली होती. 1998 च्या या अविस्मरणीय घटनेनंतर आपले माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनी भारताला देशाला संपूर्ण अण्वस्त्रक्षम म्हणून घोषित केले होते. तेव्हापासून, शास्त्रज्ञ, संशोधक, अभियंते आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित सर्वांच्या कामगिरीचे स्मरण करण्याच्या उद्देशाने, 11 मे हा राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा केला जात आहे.
हा विशेष दिवस साजरा करण्यासाठी, भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची वैधानिक संस्था असलेले तंत्रज्ञान विकास मंडळ ,राष्ट्रीय विकासात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या तंत्रज्ञान विषयक अभिनव संशोधनांना 1999 पासून राष्ट्रीय तंत्रज्ञान पुरस्कार' देऊन गौरवते.
2023 वर्षासाठी ,राष्ट्रीय तंत्रज्ञान पुरस्कारांसाठी तंत्रज्ञान विकास मंडळाने भारतीय कंपन्यांकडून मुख्य,सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई ), स्टार्टअप, ट्रान्सलेशनल रिसर्च आणि टेक्नॉलॉजी बिझनेस इनक्यूबेटर या पाच श्रेणींमध्ये अर्ज मागवले आहेत. अभिनव स्वदेशी तंत्रज्ञानाच्या यशस्वी व्यवसायिकरणासाठी विविध उद्योगांना हे पुरस्कार प्रदान केले जातात. हा वार्षिक सन्मान भारतीय उद्योगांना आणि त्यांच्या तंत्रज्ञान प्रदात्यांना मान्यता मिळवून देण्याचे एक व्यासपीठ प्रदान करतो , जे बाजारात नाविन्यपूर्ण संशोधन आणण्यात आणि "आत्मनिर्भर भारत" स्वप्न साकारण्यात मदत करतात.
11 मे 2023 रोजी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनी हे पुरस्कार प्रदान केले जातील.
अर्ज करण्यासाठी- https://awards.gov.in/ इथे भेट द्या
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 15 जानेवारी 2023 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत.
***
Nilima C/Sushama K/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1884013)
Visitor Counter : 181