पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषद
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांची आर्थिक सल्लागार समिती (ईएसी-पीएम) राज्य आणि जिल्ह्यांसाठी सामाजिक प्रगती निर्देशांक (एसपीआय) जारी करणार

Posted On: 15 DEC 2022 7:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 डिसेंबर 2022

 

पंतप्रधानांची आर्थिक सल्लागार समिती (ईएसी-पीएम) 20 डिसेंबर 2022 रोजी भारतातील राज्ये आणि जिल्ह्यांसाठी सामाजिक प्रगती निर्देशांक (एसपीआय) जारी करणार आहे. डॉ. अमित कपूर यांच्या अध्यक्षतेखालील स्पर्धात्मकता संस्थेने हा अहवाल तयार केला आहे.  प्रगतीबाबतचा महत्त्वाचा  अहवाल, मायकेल ग्रीन यांच्या नेतृत्वाखाली तयार केला आहे. 

देशाने राष्ट्रीय आणि उप-राष्ट्रीय स्तरावर केलेल्या सामाजिक प्रगतीच्या सर्वांगीण उपाययोजनांचे, एसपीआय हे एक सर्वसमावेशक साधन आहे. नागरिकांची सामाजिक प्रगती ही दीर्घकालीन आर्थिक वाढ टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाची आहे हे लक्षात घेऊन, आर्थिक वाढ आणि विकासाच्या पारंपारिक उपायांसाठी हा निर्देशांक पूरक आहे. समाजाच्या गरजा चांगल्या प्रकारे समजू शकणार्‍या मापन प्रारुपाची निकड लक्षात घेऊन, धोरणकर्त्यांकरता आवश्यक ज्ञान आणि साधने सुसज्ज करत, अहवालासाठी सामाजिक प्रगतीचे योग्य संकेतक आणि उपाय ओळखण्याकरता विस्तृत संशोधन टप्प्याला पथकाने सुरुवात केली. 

सामाजिक प्रगतीच्या तीन आयामांवर राज्ये आणि जिल्ह्यांच्या कामगिरीचे एसपीआय मूल्यांकन करते: मूलभूत मानवी गरजा, कल्याणाचा पाया आणि संधी.  प्रत्येक परिमाणात चार घटक आहेत.

  • मूलभूत मानवी गरजांचे परिमाण पोषण आणि मूलभूत वैद्यकीय काळजी, पाणी आणि स्वच्छता, वैयक्तिक सुरक्षा आणि निवारा या संदर्भात राज्ये आणि जिल्ह्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करते.
  • मूलभूत ज्ञान, माहितीआणि संवाद, आरोग्य, निरामयता आणि  पर्यावरण गुणवत्ता या क्षेत्रांमध्ये सर्वाना प्रवेश सुकर असणे यावर देशाने केलेल्या प्रगतीचे मूल्यांकन कल्याणकारी पायाचे परिमाण आहेत.
  • संधीचे परिमाण वैयक्तिक हक्क, वैयक्तिक स्वातंत्र्य आणि निवड, सर्वसमावेशकता आणि प्रगत शिक्षणात सर्वाना  प्रवेश या पैलूंवर लक्ष केंद्रित करते.

या अहवालाचे प्रकाशन केंद्रीय  महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी आणि पंतप्रधानांच्या  आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष डॉ.  बिबेक देबरॉय, यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात  सोशल प्रोग्रेस इम्पेरेटिव्हचे मुख्य कार्यकारी अधिकारी मायकेल ग्रीन आणि स्पर्धात्मकता संस्थेचे  मानद अध्यक्षआणि स्टॅनफोर्ड विद्यापीठातील व्याख्याता, डॉ. अमित कपूर, आपला दृष्टिकोन आणि सूचना मांडतील. 

या अहवालाचा उद्देश राज्य आणि जिल्हावार क्रमवारी आणि गुणपत्रिकेसह, देशातील सर्व स्तरांवर झालेल्या सामाजिक प्रगतीचा पद्धतशीर आढावा घेणे हा  आहे. याशिवाय निर्देशांकात जिल्ह्यांनी केलेली  उत्तम कामगिरी आणि सामाजिक प्रगती साध्य करण्यात राज्यांची भूमिका यावर देखील हा अहवाल प्रकाश टाकेल. या अहवालातील एक विशेष विभाग भारतातील आकांक्षी जिल्ह्यांचे विश्लेषण करतो  ज्यामुळे तळागाळातील सामाजिक प्रगतीचे व्यापक आकलन होते. 

प्रकाशन सोहळा  नॅशनल नेहरू मेमोरियल म्युझियम, (सेमिनार रूम), तीन मूर्ती हाऊस, नवी दिल्ली येथे 20 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11:00 ते दुपारी 1:00 या वेळेत होईल. कार्यक्रम पत्रकारांसाठी खुला आहे.

 

* * *

S.Kakade/V.Ghode/B.Sontakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1883897) Visitor Counter : 194


Read this release in: Kannada , English , Urdu , Hindi