पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आंतरराष्ट्रीय बाजारात, इंधनाच्या दरात विक्रमी वाढ होऊनही, सहा एप्रिल 2022 नंतर भारतात सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर वाढवलेले नाहीत- हरदीप सिंग पुरी


आंतरराष्ट्रीय बाजारात, कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याचा फटका भारतीय ग्राहकांना बसू नये, यासाठी केंद्र सरकारने केंद्रीय उत्पादन शुल्कात दोनदा कपात केली

Posted On: 15 DEC 2022 3:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 डिसेंबर 2022

 

भारत आपल्या एकूण कच्च्या तेलाच्या गरजेपैकी 85 टक्के कच्चे तेल आयात करतो. म्हणून, देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारातील, त्यांच्या संबंधित किमतीशी निगडीत असतात. पेट्रोल-डिझेलच्या किरकोळ किमती, अनेक गोष्टींवर अवलंबून असतात. जसे की, कच्च्या तेलाच्या खरेदीची किंमत, विनिमय दर, दळणवळण शुल्क, अंतर्गत मालवाहतूकीचा खर्च, तेलशुद्धीकरण खर्च, डिलरचे कमिशन, केंद्रीय शुल्क, राज्यांचा मूल्यवर्धित कर, आणि इतर खर्चाच्या बाबी, इत्यादि.

नोव्हेंबर 2020 ते नोव्हेंबर 2022 या काळात, भारतीय बाजारात, कच्च्या तेलाच्या सरासरी किमती, 102 टक्क्यांनी ( 43.34 डॉलर्सपासून ते 87.55डॉलर्सपर्यंत) वाढल्या असल्या तरीही, या काळात पेट्रोल-डिझेलच्या किरकोळ दरात अनुक्रमे केवळ, 18.95 टक्के आणि 26.5 टक्के एवढीच वाढ झाली आहे.

काही देशांमधील पेट्रोल डिझेलच्या किमतीत झालेली वाढ- आणि भारतातील दर यांची तुलनात्मक आकडेवारी खालीलप्रमाणे::

(किमतीत भारतीय चलनात)

 

  Oct 2022

  Oct 2020

% Change

Country

Petrol

Diesel

Petrol

Diesel

Petrol

Diesel

India (Delhi)

96.72

89.62

81.06

70.53

19.3%

27.1%

USA

83.00

113.38

41.87

46.35

98.2%

144.6%

Canada

104.65

130.84

57.96

54.87

80.6%

138.4%

Spain

140.47

154.88

100.27

88.96

40.1%

74.1%

UK

152.41

171.35

108.06

112.76

41.0%

52.0%

Exchange rate

Rs. 82.34/$

Rs. 73.46/$

12 %

 

स्रोत: पेट्रोलियम प्लॅनिंग अँड अॅनालिसिस सेल (PPAC), IEA च्या नोव्हेंबर ’20 आणि नोव्हेंबर  ’22  च्या अहवालावर आधारित.

आंतरराष्ट्रीय किमतीत विक्रमी वाढ झाली असूनही 6 एप्रिल 2022 पासून सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या नाहीत. परिणामी, आर्थिक वर्ष 2021-22 च्या सहामाहीमध्ये 28360 कोटी इतका एकत्रित ‘करपूर्व नफा’  असलेल्या तीन तेल विपणन कंपन्या आयओसीएल, बीपीसीएल आणि एचपीसीएल यांना चालू आर्थिक वर्ष,2022-23 च्या पहिल्या सहमाहीत, 27276 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीचा फटका भारतीय ग्राहकांना बसू नये, यासाठी, केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात दोन वेळा, 21 नोव्हेंबर 2021 आणि 22 मे 2022 रोजी कपात केली. यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती अनुक्रमे 13 आणि 16 रुपयांनी कमी झाल्या आणि हा पूर्ण लाभ ग्राहकांनाच दिला गेला. सरकारने उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर काही राज्यांनी/केंद्रशासित प्रदेशांनीही आपल्या मूल्यवर्धित करात (VAT)  कपात केली. दिल्लीत डिसेंबर 2020 पासून, पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ मासिक किमती किती होत्या, याची सविस्तर माहिती परिशिष्ट क्रमांक 1 मध्ये दिली आहे.

भारत आपल्या देशांतर्गत वापराच्या 60% पेक्षा जास्त एलपीजीची आयात करतो. देशातील एलपीजीचे दर सौदी कॉन्ट्रॅक्ट प्राइस (CP) या आंतरराष्ट्रीय किमतींचा बेंचमार्कवर आधारित आहेत. सौदी CP चे दर एप्रिल 2020 मध्ये 236 $/मेट्रिक टन वरून एप्रिल 2022 मध्ये 952 $/मेट्रिक टन पर्यंत वाढले आणि सध्याही उच्च पातळीवर कायम आहेत. मात्र तरीही, सरकार देशांतर्गत एलपीजीसाठी ग्राहकांसाठी प्रभावी किंमतीमध्ये बदल करत आहे. घरगुती एलपीजीच्या विक्रीवर सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागला आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने नुकतीच एकरकमी भरपाई म्हणून तेल विपणन कंपन्यांना 22000 कोटी रुपये दिले आहेत.

डिसेंबर 2020 पासून घरगुती LPG (दिल्ली येथे) च्या किरकोळ विक्री किंमती(RSP) चे तपशील परिशिष्ट-II मध्ये दिले आहेत.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली.

 

* * *

S.Kakade/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1883763) Visitor Counter : 301