आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने (एनएचए) 'भारतातील एकत्रित आरोग्य इंटरफेस (युएचआय) कार्यान्वयन ' या विषयावरील सल्लापत्रावर सूचना मागवल्या आहेत

Posted On: 15 DEC 2022 2:18PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 डिसेंबर 2022

 

राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने (एनएचए) ने ''भारतातील एकत्रित आरोग्य इंटरफेस (युएचआय)) कार्यान्वयन '' वर सल्लामसलत प्रपत्र जारी केले आहे यामध्ये एकत्रित आरोग्य इंटरफेस नेटवर्कला नियंत्रित करणार्‍या बाजारातील नियमांची रूपरेषा दिली आहे. आयुष्मान भारत डिजिटल मोहिमेचा  (ABDM)  पहिला टप्पा किंवा पाया अशी  युएचआयची संकल्पना असून खुल्या प्रोटोकॉलद्वारे भारतातील आरोग्य सेवांमध्ये संलग्नता आणि आंतर कार्यान्वयन साध्य करण्याचे उद्दिष्ट आहे.

सल्लामसलत प्रपत्र युएचआयच्या विविध पैलूंवर आणि त्यांना नियंत्रित करणाऱ्या बाजारातील नियमांवर प्रकाश टाकते. या मध्ये समाविष्ट असलेली मार्गदर्शक तत्त्वे निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने शोध घेण्याचा मार्ग नियंत्रित करतील, याशिवाय देयक आणि निवारण प्रक्रिया, रद्द करणे आणि वेळापत्रक पुन्हा जारी करण्यासंदर्भातील नियम, तक्रार निवारण यंत्रणा आणि इतर गोष्टींचा समावेश आहे. प्रत्येक विभागात विशिष्‍ट खुले प्रश्‍न असतील ज्यात  भागधारकांकडून अभिप्राय मागवला जाईल.

या सल्लामसलत प्रपत्रच्या महत्त्वाबद्दल बोलताना, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आर. एस. शर्मा म्हणाले."एकत्रित आरोग्य इंटरफेसमुळे भारतातील आरोग्य सेवांमध्ये संलग्नता आणि आंतर कार्यान्वयन साध्य केले जाईल. युएचआय विकसित करण्यात अनेक हितधारकांच्या हातभार लागणार असल्याने वेगवेगळे घटक, निष्पक्ष, कार्यक्षम आणि पारदर्शक पद्धतीने कशा प्रकारे कार्यान्वित केले जातील याची स्पष्ट रूपरेषा असणे अतिशय आवश्यक आहे आम्ही हितधारकांना त्यांच्या मौलिक सूचना देण्याचे आणि भारताच्या डिजिटल आरोग्य सेवा परिसंस्थेला आकार देण्यासाठी भूमिका बजावण्याचे आवाहन करतो.  हितधारकांच्या सहभागामुळे याच्या अंमलबजावणीत येणारे संभाव्य अडथळे दूर होतील आणि ते सुलभ रीत्या आणि लवकरात लवकर अंमलात येईल."

सल्लामसलत प्रपत्राचा संपूर्ण मजकूर ए बी डी एम च्या  संकेतस्थळावर प्रकाशन विभागांतर्गत डाउनलोड करण्यासाठी शुक्रवार, 13 जानेवारी 2023 पर्यंत उपलब्ध आहे. https://abdm.gov.in/publications. अभिप्राय आणि सूचना   https://abdm.gov.in/operationalising-uhi-consultation- यावर पाठवता येतील.

 

* * *

S.Kane/B.Sontakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1883726) Visitor Counter : 243