अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कर्नाटकमध्ये बंगळूरू येथे भारताच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली पहिली जी20 वित्त आणि सेंट्रल बँक डेप्युटीजची (एफसीबीडी) बैठक


160 पेक्षा अधिक प्रतिनिधींच्या उपस्थितीसह एफसीबीडीच्या बैठकीने झाली भारताच्या अध्यक्षतेखालील जी20 फायनान्स ट्रॅकची सुरुवात

जागतिक अर्थव्यवस्था, आंतरराष्ट्रीय आर्थिक संरचना, पायाभूत सुविधा, शाश्वत अर्थ पुरवठा, आंतरराष्ट्रीय कर आकारणी, जागतिक आरोग्य, आर्थिक क्षेत्र आणि आर्थिक समावेश या सात विषयांवरील चर्चा सत्रांनी एफसीबीडीच्या दोन दिवसीय बैठकीचा समारोप

बैठकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आली ‘'21व्या शतकातील सामायिक जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी एमडीबी बळकट करणे” आणि "हवामानाच्या जोखमीचे व्यवस्थापन आणि हरित अर्थपुरवठा यामध्ये केंद्रीय बँकांची भूमिका" या विषयांवरील चर्चा सत्रे

Posted On: 14 DEC 2022 6:34PM by PIB Mumbai

भारताच्या अध्यक्षतेखालील पहिली जी20 वित्त आणि सेंट्रल बँक डेप्युटीजची बैठक कर्नाटकमध्ये बंगळूरू येथे डिसेंबर13-142022 दरम्यानआर्थिक व्यवहार सचिव अजय सेठ आणि रिझर्व बँकेचे डेप्युटी गव्हर्नर डॉ. मिशेल पात्रा यांच्या सह-अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीमध्ये जी 20 सदस्य देशांचे प्रतिनिधीआमंत्रित देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांसह 160 पेक्षा अधिक परदेशी प्रतिनिधींनी उत्साहाने उपस्थिती नोंदवली. याबरोबरच भारताच्या अध्यक्षतेखालील जी 20 फायनान्स ट्रॅकची सुरुवात झाली.

या दोन दिवसीय बैठकीच्या पार्श्वभूमीवरसात चर्चा सत्रे आणि दोन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध कलाप्रकारांच्या दिमाखदार प्रदर्शनामधून सहभागी प्रतिनिधींना कर्नाटकच्या पारंपरिक आणि समकालीन संस्कृतीची झलकही दाखवण्यात आली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दृष्टीकोन आणि भारताच्या अध्यक्षतेखालील जी 20 परिषदेची संकल्पना लक्षात घेऊनया बैठकीचा जाहीरनामा तयार करण्यात आला होता.

2023 साठी विविध कार्यक्षेत्रांमधील भारताच्या जी20 फायनान्स ट्रॅकच्या  प्राधान्यक्रमांवर जी 20 सदस्यांची मते जाणून घेण्याच्या उद्देशाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. डेप्युटी बैठकीच्या पार्श्वभूमीवर, ‘'21व्या शतकातील सामायिक जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी एमडीबी बळकट करणे” या विषयावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.    

या कार्यक्रमालानीती आयोगाचे कुलगुरू सुमन बेरी यांनी संबोधित केले. जगातील देशांना सीमेपलीकडच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी एमबीडी कशी मदत करेलया विषयावर यावेळी भर देण्यात आला. या कार्यक्रमात अमेरिकेचे उप अर्थमंत्री अँडी बौकोल आणि सौदी अरेबियाचे उप अर्थमंत्री रियाद अल्खारीफ यांच्यासह एडीबी चे महासंचालक टोमोयुकी किमुरा आणि प्रो. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाचे देवेश कपूर पॅनेलिस्ट म्हणून सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या विषयावर त्यांनी आपले विचार मांडले. हवामानाच्या जोखमीचे व्यवस्थापन आणि हरित अर्थपुरवठा यामध्ये केंद्रीय बँकांची भूमिका’ हा कार्यक्रम देखील यावेळी आयोजित करण्यात आला होता.   

बंगळूरु इथल्या बैठकीमधील जी 20 देशांची बहुतेक सर्व शिष्टमंडळेनिमंत्रित आणि आंतरराष्ट्रीय संस्था यांची प्रत्यक्ष उपस्थितीविशेषतः आव्हानात्मक जागतिक वातावरणामध्ये,  भारताच्या जी 20 अध्यक्षपदाला पाठिंबा देण्याची जागतिक बांधिलकी दर्शवते. -----

---- वसुधैव कुटुंबकम्” आणि एक पृथ्वीएक कुटुंबएक भविष्य” ही संकल्पना प्रतिबिंबित करूनचर्चा जागतिक अर्थव्यवस्था आणि जोखीमबहुउद्देशीय विकास बँका (MDBs) बळकट करणेजागतिक कर्ज असुरक्षा व्यवस्थापित करणेहवामान उपक्रम आणि शाश्वत विकास उद्दिष्टाना वित्तपुरवठा करणे आणि उद्याची लवचिकसर्वसमावेशक आणि टिकाऊ शहरे निर्माण करणे यासंबंधित मुद्द्यांवर चर्चेचा भर होता.

जागतिक अर्थव्यवस्था आणि आराखडा कार्य गटाच्या प्राधान्यक्रमांवरील पहिल्या सत्रादरम्यानजी 20 सदस्यांनी जागतिक चलनफुगवटाअन्न आणि ऊर्जा असुरक्षितता आणि हवामान बदलाच्या व्यापक आर्थिक परिणामांसह जागतिक आर्थिक आव्हानांवर चर्चा केली.

इंटरनॅशनल फायनान्शिअल आर्किटेक्चरवरील सत्रातप्रतिनिधींनी बहुउद्देशीय विकास बँका (MDBs) बळकट  करणे यासह विविध मुद्द्यांवर चर्चा केली आणि जागतिक कर्ज संकटभांडवली ओघ आणि जागतिक आर्थिक सुरक्षा जाळे यासह प्रमुख विषयांवर 2023 मध्ये हाती घेतलेल्या कामावर विचार विनिमय केला.

पायाभूत सुविधा सत्रातपायाभूत सुविधा कार्य गट 2023 साठी भारताच्या प्राधान्यक्रमांवर चर्चा झाली ज्यामध्ये "उद्याच्या शहरांना वित्तपुरवठा: समावेशकलवचिक आणि शाश्वत" यांचा समावेश आहे.

शाश्वत वित्तविषयक मुद्द्यांवरसदस्यांनी शाश्वत आणि लवचिक जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी हवामान कृतीसह शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs) साठी वित्तपुरवठा करण्यावर विचार विनिमय केला.

वित्तीय सहकार्य आणि विकास संस्था/ जी 20 सर्वसमावेशक आराखड्या अंतर्गत विकसित करण्यात येत असलेल्या द्वि-स्तंभ कर पॅकेजच्या प्रगतीवर लक्ष ठेवणेकर पारदर्शकता वाढवणे आणि कर आकारणीवर बहुउद्देशीय क्षमता बांधणी यासह 2023 च्या प्राधान्य क्षेत्रावरील आंतरराष्ट्रीय करप्रणालीवरील सत्रादरम्यान भरीव चर्चा झाली.

जागतिक आरोग्यविषयक चर्चासत्रात,  जी 20 प्रतिनिधींनी प्रमुख प्रादेशिक संस्थांना चर्चेसाठी आमंत्रित करून कमी उत्पन्न असलेल्या देशांना व्यक्त व्हायची संधी देण्याबरोबरचमहामारी प्रतिबंधक तयारी आणि प्रतिसाद (PPR) यासाठी वित्त आणि आरोग्य मंत्रालयांमधील समन्वय व्यवस्था मजबूत करण्यावर चर्चा केली.

सभेच्या शेवटच्या सत्रात आर्थिक क्षेत्र आणि आर्थिक समावेशाचे मुद्दे घेण्यात आले. आर्थिक क्षेत्राच्या घडामोडींवर आणि लोककेंद्रित दृष्टीकोनातून आर्थिक समावेशकता वाढवण्याच्या दृष्टिकोनावर चर्चा झाली. मान्यवरांनी योग्य आर्थिक नियमांसाठी आणि समान दृष्टीकोनातून आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी प्राधान्यक्रमांवर विचारांची देवाणघेवाण केली.

एकूणचया बैठकीत 2023 साठी भारताच्या जी 20 वित्तीय ट्रॅक जाहीरनाम्याचा प्रस्तावित प्राधान्यक्रमांना व्यापक पाठिंबा दिसला. भारतीय जी 20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळात जाहीरनाम्यातील पुढील घटक वित्त आणि सेंट्रल बँकेच्या प्रतिनिधींनी व्यापक दृष्टिकोनातून मांडलेल्या विचारांनी समृद्ध होतील.

या चर्चांमुळे 23-25 फेब्रुवारी दरम्यान कर्नाटकातील बेंगळुरू येथे होणार्‍या पहिल्या जी 20 अर्थमंत्री आणि सेंट्रल बँक गव्हर्नरच्या बैठकीचा मार्ग मोकळा होईल.

***

ShaileshP/Rajshree/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1883637) Visitor Counter : 264


Read this release in: English , Urdu , Telugu , Kannada