अंतराळ विभाग
शुक्र मोहिम तसेच एरोनॉमी व्यवहार्यतेच्या अभ्यासासाठी इस्रोचा पुढाकार ,केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह
Posted On:
14 DEC 2022 12:22PM by PIB Mumbai
केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान; राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पृथ्वी विज्ञान; पीएमओ, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, पेन्शन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज माहिती दिली की, शुक्र मोहिम तसेच एरोनॉमी व्यवहार्यतेच्या अभ्यासासाठी इस्रोने पुढाकार घेतला आहे.
"एरोनॉमी" ही संज्ञा सुमारे 60 वर्षांपूर्वी तयार केली गेली आणि प्रचलित आहे जी पृथ्वीच्या वातावरणातील वरचा भाग आणि सौर मंडळाच्या इतर घटकांच्या वैज्ञानिक अभ्यास करते . यामध्ये न्यूट्रल आणि चार्ज कणांचे रसायन विज्ञान , गतिशीलता आणि ऊर्जा संतुलन या बाबीं समाविष्ट आहेत.
लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, या दोन्ही मोहिमांची संकल्पना तयार केली जात आहे आणि वैज्ञानिक समुदायाच्या सहभागाने राष्ट्रीय स्तरावर चर्चा केली जात आहे.
***
Sushama Kane/Vikas Y/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1883387)
Visitor Counter : 162