गृह मंत्रालय
निर्भया फंड
Posted On:
13 DEC 2022 5:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 डिसेंबर 2022
देशभरात सध्या कार्यरत असलेली मानवी तस्करी विरोधी केंद्रे/युनिट्स (एएचटीयू) बळकट करण्यासाठी आणि राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सर्व जिल्ह्यांमध्ये नवीन एएचटीयू स्थापन करण्यासाठी, गृह मंत्रालयाने 2019-20 आणि 2020-21 या आर्थिक वर्षांमध्ये सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना "निर्भया फंड" अंतर्गत 98.86 कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली आहे.
गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
* * *
S.Kakade/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1883109)
Visitor Counter : 239