पंतप्रधान कार्यालय
श्री अरबिंदो यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त 13 डिसेंबर रोजी आयोजित होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान होणार सहभागी
या प्रसंगी श्री अरबिंदो यांच्या सन्मानार्थ पंतप्रधान करणार एका स्मृती नाण्याचे आणि टपाल तिकिटाचे प्रकाशन
Posted On:
12 DEC 2022 7:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 डिसेंबर 2022
श्री अरबिंदो यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त 13 डिसेंबर 2022 रोजी आयोजित होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी पाच वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत पुद्दुचेरी येथे कंबलन कलाई संगममध्ये या कार्यक्रमाचे आयोजन होणार असून या कार्यक्रमात श्री अरबिंदो यांच्या सन्मानार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी एका स्मृती नाण्याचे आणि टपाल तिकिटाचे प्रकाशन करतील. यावेळी श्री अरबिंदो यांच्या अनुयायांसह उपस्थितांसमोर पंतप्रधान आपले विचार देखील व्यक्त करतील.
भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचे योगदान देणारे आणि दूरदृष्टी असलेल्या श्री अरबिंदो यांचा जन्म 15 ऑगस्ट 1872 रोजी झाला. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारताची जनता, संस्कृती आणि साध्य केलेली कामगिरी यांच्या गौरवशाली इतिहासाचा आनंद साजरा करण्याच्या उद्देशाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवांतर्गत देशभरात संपूर्ण वर्षभर विविध उपक्रम आणि कार्यक्रम आयोजित करून श्री अरबिंदो यांची 150 वी जयंती साजरी केली जात आहे.
* * *
N.Chitale/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1882896)
Visitor Counter : 235
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam