रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 2,444 कोटी रुपयांच्या 7 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे आणि मध्य प्रदेशातील रेवा इथे 1600 कोटी रुपयांच्या 2.28 किलोमीटर लांबीच्या सहा पदरी  दुहेरी बोगद्याचे  उद्घाटन

प्रविष्टि तिथि: 10 DEC 2022 6:34PM by PIB Mumbai

 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज मध्य प्रदेशातील रेवा येथे एकूण 204 किमी लांबीच्या 2,444 कोटी रुपयांच्या 7 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन केले.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना  गडकरी म्हणाले, चुरहाट बोगदा आणि बायपासच्या बांधकामामुळे रेवा ते सिधी दरम्यानचे  अंतर 7 किलोमीटरने कमी झाले आहे.  आता अडीच तासांऐवजी आपण हे अंतर 45 मिनिटांत पार करू शकतो.

देवतलाब-नायगढ़ी रस्त्याच्या बांधकामामुळे रेवा जिल्ह्याचा प्रयागराज आणि वाराणसीशी संपर्क प्रस्थापित होईल.

यावेळी गडकरी यांनी रेवा-सिधी रस्त्याचे चौपदरीकरणाला  मंजूरी देत  रुंदीकरणाची घोषणा केली. 

यानंतर नितीन गडकरी यांनी आज मध्य प्रदेशातील रेवा येथे 2.28 किमी लांबीच्या मध्य प्रदेशातील पहिल्या 1600 कोटी रुपयांच्या सहा पदरी  दुहेरी बोगद्याचे आणि 13 किमी चौपदरी  बायपासचे उद्घाटन केले.

***

N.Chitale/G.Deoda/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1882398) आगंतुक पटल : 184
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi , Telugu