पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
जैवइंधन विकणारे पेट्रोल पंप
Posted On:
08 DEC 2022 4:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 डिसेंबर 2022
सध्या देशात जैवइंधन विकणाऱ्या किरकोळ विक्री केंद्रांची (आरओ) संख्या खालीलप्रमाणे आहे:
कॉम्प्रेस्ड बायो गॅस (CBG) विकणाऱ्या विक्री केंद्रांची संख्या- 90
E100 विकणाऱ्या विक्री केंद्रांची संख्या - 3,
याशिवाय, इथेनॉल मिश्रित पेट्रोल देशभरात विकले जाते.
सरकारने 8 नोव्हेंबर 2019 रोजीच्या ठरावाद्वारे वाहतूक इंधनाच्या बाजारपेठेच्या अधिकृततेसाठी मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा केली आहे. अधिकृत संस्थांनी त्यांच्या प्रस्तावित किरकोळ विक्री केंद्रांवर, केंद्र सुरू केल्यापासून तीन वर्षांच्या आत इतर विविध वैधानिक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत जैव इंधनासह किमान एका नवीन पिढीच्या पर्यायी इंधनाच्या विपणनाची सुविधा स्थापित करणे आवश्यक आहे.
ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम (आयआयपी), इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसीएल) आणि सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरर्स (एसआयएएम) यांनी केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की ई-20 मिश्रणामुळे कार्बन मोनोऑक्साइड उत्सर्जनात घट झाली. सामान्य पेट्रोलच्या तुलनेत दुचाकींमध्ये 50% आणि चारचाकी वाहनांमध्ये 30% घट कार्बन मोनोऑक्साइड मध्ये झाली. तर, सामान्य पेट्रोलच्या तुलनेत दुचाकी आणि चार चाकी वाहनांमध्ये हायड्रोकार्बन उत्सर्जन 20% कमी झाल्याचे दिसून आले आहे.
परकीय चलनाच्या वास्तविक बचतीबाबत कोणतेही निश्चित अंदाज नाहीत कारण ते कच्च्या तेलाच्या किमती आणि प्रचलित परकीय चलन (forex) दर इत्यादी विविध घटकांवर अवलंबून असते. तथापि, इथेनॉल पुरवठा वर्ष (ESY) 2021-22 (ESY: 1 डिसेंबर ते 30 नोव्हेंबर) मध्ये 15 नोव्हेंबर 2022 पर्यंत पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण केल्याने कच्चे तेल आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या आयात बिलावर सुमारे 20,000 कोटी रुपयांपेक्षा पेक्षा जास्त परिणाम झाला आहे.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
S.Kakade/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1881814)
Visitor Counter : 156