रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
नागालँडमधील दिमापूर ते कोहिमा रोड (पॅकेज-1) पर्यंत चार पदरी 14.93 किलोमीटरचा प्रकल्प यावर्षी पूर्ण होईल : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी
प्रविष्टि तिथि:
06 DEC 2022 6:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 डिसेंबर 2022
नागालँड राज्यातील दिमापूर ते कोहिमा रोड (पॅकेज-1) पर्यंत चार पदरी 14.93 किलोमीटरचा रस्ते प्रकल्प यावर्षी पूर्ण होईल. या प्रकल्पात 387 कोटी रुपयांची गुंतवणूक असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट मालिकेत दिली आहे.

या प्रकल्पामुळे नागालँड आणि मणिपूर या राज्यांत मार्ग वाहतूक अधिक चांगल्या रीतीने होईल तसेच प्रवासाचा वेळही मोठ्या प्रमाणात कमी होईल, असे त्यांनी सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सर्वोत्तम रस्ते पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण काम करत असल्याचे गडकरी यांनी पुढे नमूद केले.
R.Aghor/P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1881199)
आगंतुक पटल : 168