शिक्षण मंत्रालय
काशी तमिळ संगमममध्ये सहभागी होण्यासाठी तमिळ व्यावसायिकांची तुकडी काशीत दाखल
तमिळ व्यावसायिकांनी घेतलं श्री काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन दर्शन; संध्याकाळी गंगा आरतीही करणार
प्रविष्टि तिथि:
06 DEC 2022 4:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 डिसेंबर 2022
तमिळ उद्योजकांची तुकडी ‘काशी तमिळ संगमम’ मध्ये सहभागी होण्यासाठी एर्नाकुलम-पाटणा सुपरफास्ट एक्सप्रेस रेल्वेगाडीने काशी या तीर्थक्षेत्री काल रात्री पोहोचली. वाराणसी कॅन्टोनमेंट रेल्वे स्थानकावर या तुकडीचे आगमन होताच अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक लालजी चौधरी यांनी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. यावेळी पुष्पवृष्टीही करण्यात आली.


व्यावसायिकांच्या या शिष्टमंडळाने सकाळी ‘श्री काशी विश्वनाथ मंदिर’ आणि ‘गंगा घाट’ येथे जाऊन प्रार्थना केली. त्यांनी ‘माता विशालाक्षी’ आणि ‘माता अन्नपूर्णा’ यांच्या दरबारात जाऊन प्रार्थना केली. त्यांच्या दौऱ्याचा एक भाग म्हणून ते रविदास घाटावरही जाणार आहेत आणि गंगा आरतीतही सहभागी होतील.
बनारस हिंदू विद्यापीठाच्या परिसरात आज ‘कार्तिकाई दीपम’ हा प्रसिद्ध प्रकाशोत्सव साजरा होणार आहे. विद्यापीठाचा परिसर हजारो दिव्यांनी उजळून निघेल. बनारस हिंदू विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आणि तमिळनाडूहून आलेल्या पाहुण्यांनी हे स्थळ सजवले आहे.
R.Aghor/P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1881153)
आगंतुक पटल : 214