विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

''भारतातील आरोग्य आणि विज्ञान क्षेत्रामध्ये होणाऱ्या बदलांचे नेतृत्व करणाऱ्या महिला'' या विषयावर नवी दिल्लीत आयोजित परिषदेचे केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांच्या हस्ते उद्या उद्घाटन


या परिषदेत बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या सह-अध्यक्ष आणि विश्वस्त मेलिंडा फ्रेंच गेट्स या विषयावर आपले विचार मांडतील

Posted On: 05 DEC 2022 2:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 डिसेंबर 2022

 

केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान; राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पृथ्वी विज्ञान; पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह  उद्या नवी दिल्ली येथे आयोजित ''भारतातील आरोग्य आणि विज्ञान क्षेत्रामध्ये होणाऱ्या बदलांचे नेतृत्व करणाऱ्या महिला'' या विषयावरील परिषदेचे उद्घाटन करणार आहेत.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार, बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या सह-अध्यक्ष आणि विश्वस्त   मेलिंडा फ्रेंच गेट्स, तसेच  वुमनलिफ्ट हेल्थच्या कार्यकारी संचालक एमी बॅट्सन या देखील या  परिषदेला संबोधित करणार आहेत.

भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचा जैवतंत्रज्ञान विभाग आणि जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहाय्य परिषद (बीआयएआरसी ), जैवतंत्रज्ञान विभागाचे सार्वजनिक क्षेत्रातले उपक्रम यांनी  वूमनलिफ्ट हेल्थ आणि ग्रँड चॅलेंजेस इंडिया यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या  या परिषदेत आरोग्य आणि विज्ञान क्षेत्रातील  महिलांच्या नेतृत्वाचे महत्त्व अधोरेखित केले जाईल आणि त्याला  प्रोत्साहन देण्यात येईल. तसेच  भारत आणि जागतिक आरोग्य व्यवस्थेतील आघाडीच्या  पदांवर महिलांचे प्रतिनिधित्व बळकट  करण्यासाठी योग्य  मार्ग आणि उद्दिष्टे निश्चित करण्याचा प्रयत्न या परिषदेच्या माध्यमातून केला जाणार आहे.

गेल्या काही वर्षांतील अभूतपूर्व आव्हानांवर मात करून विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या क्षेत्रात नवोन्मेष साधण्यासाठी आणि आरोग्यसेवा अत्याधुनिक करण्यासाठी अथक लवचिकतेने आणि अखंड चिकाटीने केलेल्या भारतीय महिलांच्या कामगिरीचा   गौरव करण्यासाठी  आणि हे यश साजरे करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

वुमनलिफ्ट हेल्थ बद्दल

वुमनलिफ्ट हेल्थ परिषद  हा स्टॅनफोर्ड विद्यापीठाचा उपक्रम आहे आणि 2017 पासून ,जागतिक आरोग्य समुदायातील प्रस्थापित आणि उदयोन्मुख नेत्यांना एकत्रितपणे भेटण्यासाठी आणि आरोग्य क्षेत्रातील नेतृत्वामध्ये लिंग  समानता वाढवण्यासाठी, जागतिक आरोग्य क्षेत्रामध्ये वैविध्य  आणि महिला नेतृत्व वाढवण्याच्या वाढत्या गतीमध्ये योगदान देण्यासाठी आणि महिलांच्या नेतृत्वासाठी देश, क्षेत्रे आणि विषयांमधील संधी आणि आव्हानांची समज वाढवण्याच्या दृष्टीने एक मंच प्रदान करण्यासाठी  ही परिषद आयोजित केले जाते.

 

* * *

S.Patil/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1880930) Visitor Counter : 148


Read this release in: Tamil , English , Urdu , Hindi , Telugu