परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

भारताच्या जी-20 अध्यक्षपदांतर्गत पहिल्या शेर्पा बैठकीचा राजस्थानच्या ऐतिहासिक उदयपूर शहरात प्रारंभ

Posted On: 04 DEC 2022 10:53PM by PIB Mumbai

 

भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळातील पहिल्या शेर्पा बैठकीचा आज 4 डिसेंबर 2022 रोजी राजस्थानमधील  उदयपूर येथे प्रारंभ झाला. यावेळी विविध विषयांवर प्रसारमाध्यमांना माहिती देण्यात आली आणि त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. याचसोबत ‘2030 जाहीरनाम्याच्या मध्यावर जीवनात परिवर्तन- व्यापक आणि अनेकविध परिणामांच्या कालखंडात शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांच्या फलनिष्पत्तीला चालनाया विषयांवरील एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आजच्या दिवसात अनेक शेर्पांचे आणि जी-20 देशांच्या शिष्टमंडळांचे आणि निमंत्रित आंतरराष्ट्रीय संघटनांच्या प्रमुखांचे आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी आणि भारतीय आदरातिथ्य आणि कला यांचे दर्शन घडवण्यासाठी विविध राजस्थानी सांस्कृतिक कार्यक्रमांचे यावेळी आयोजन करण्यात आले. उदयपूरच्या प्रसिद्ध पिचोला तलावाच्या परिसरात टीव्ही वाहिन्यांवरील आणि मुद्रित प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी एका औपचारिक संवादाचे आयोजन करण्यात आले. आगामी वर्षातील भारतासाठी प्राधान्यक्रमाच्या बाबी, भक्कम आर्थिक विकास, हवामानविषयक उपाययोजना, महिलांच्या नेतृत्वाखाली विकास आणि इतर विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

भारताच्या जी-20 अध्यक्षपदाची आणि विविध कार्य आणि कार्यरत गटांची संरचना यांची माहिती यावेळी देण्यात आली. कार्यगटांच्या प्राधान्यक्रमांविषयी देखील माहिती देण्यात आली. अनेक जागतिक आव्हानांना तोंड देत असतानाही भारत एकतेचा आग्रह धरेल आणि इतर देशांच्या साथीने एकत्रित तोडग्यांचा शोध घेईल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. जगाच्या दक्षिणेकडे वसलेल्या देशांचा आवाज म्हणून भारताच्या भूमिकेवरही भर देण्यात आला.

शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांच्या अंमलबजावणीला चालना देण्याविषयी एका परिसंवादाचे सर्वप्रथम आयोजन करण्यात आले. जगाला नेतृत्व देण्यासाठी आणि आर्थिक संसाधने निर्माण करण्यासाठी आणि शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्याच्या मार्गावर जगाला पुन्हा परत आणण्यासाठी जी-20चा मंच म्हणजे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण संधी असल्याचा सूर या परिसंवादाच्या समारोपाच्या वेळी व्यक्त करण्यात आला.

सर्व प्रतिनिधींचे स्वागत करताना भारताचे जी 20 शेर्पा अमिताब कांत यांनी, प्रत्येक संकट म्हणजे संधी असते आणि नेतृत्व  म्हणजे अशा संकटातून पथदर्शी  तोडगा  शोधणे असा भारताचा विश्वास असल्याचे अधोरेखित केले.

***

N.Chitale/S.Patil/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1880869) Visitor Counter : 284


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu