पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
दिल्ली-एनसीआर (राष्ट्रीय राजधानी क्षेत्र) मध्ये सुधारित श्रेणीबद्ध प्रतिसाद कृती योजनेचा (जीआरएपी) तिसरा टप्पा तात्काळ प्रभावाने लागू
Posted On:
04 DEC 2022 9:51PM by PIB Mumbai
वैशिष्ट्येः
- दिल्ली-एनसीआरमध्ये गेल्या 24 तासात वायूची गुणवत्ता लक्षणीय स्वरुपात खालावल्याने वायू गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाच्या उपसमितीने(सीएक्यूएम) जीआरएपी अंतर्गत उपाययोजना करण्यासाठी तातडीची बैठक बोलावली.
- जीआरएपीच्या- अतिजास्त खालावलेल्या वायू गुणवतेबाबतच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत समाविष्ट असलेल्या सर्व उपायांचा सर्व संबंधित संस्थांनी दिल्ली-एनसीआरमध्ये तात्काळ प्रभावाने अवलंब करावा. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील उपायांना अधिक बळकट करावे.
दिल्ली-एनसीआरमध्ये गेल्या 24 तासात वायूची गुणवत्ता लक्षणीय स्वरुपात खालावल्याने वायू गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाच्या(सीएक्यूएम) उपसमितीने श्रेणीबद्ध प्रतिसाद कृती योजने(जीआरएपी) अंतर्गत दिल्ली एनसीआर आणि लगतच्या परिसरातील वायू गुणवत्ता व्यवस्थापनासाठी उपाययोजना करण्यासाठी आज तातडीची बैठक बोलावली. दिल्लीच्या एकंदर वायू गुणवत्ता निर्देशांकाने(एक्यूआय) आज संध्याकाळी 4 वाजता 407 अंकांचा टप्पा ओलांडला, जो स्थानिक प्रभाव असण्याची शक्यता आहे.
आयोगाने जीआरएपीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याअंतर्गत सध्या अंमलबजावणी सुरू असलेल्या निर्बंधात्मक/ प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा, 14.11.2022 पासून दिल्ली एनसीआरमधील एकंदर वायू गुणवत्तेवर तिसऱ्या टप्प्यातील उपाययोजना लागू केल्यावर होणाऱ्या परिणामांचा सर्वसमावेशक पद्धतीने आढावा घेतला.
एकंदर वायू गुणवत्तेच्या मानकांचा काळजीपूर्वक आढावा घेत या बैठकीदरम्यान या उपसमितीने असे नमूद केले की अचानक निर्माण झालेल्या प्रतिकूल हवामानामुळे संपूर्ण दिल्ली एनसीआरमध्ये वायूची गुणवत्ता आणखी खालावू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जीआरएपीच्या तिसऱ्या टप्प्याची पुन्हा अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
त्यामुळे संपूर्ण दिल्ली एनसीआरमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याअंतर्गत सध्या अंमलबजावणी सुरू असलेल्या निर्बंधात्मक/ प्रतिबंधात्मक उपायांव्यतिरिक्त जीआरएपीच्या तिसऱ्या टप्प्यानुसार एका नऊ कलमी कृती योजनेचा आजपासून तात्काळ प्रभावाने अवलंब करण्यात येत आहे.
***
N.Chitale/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1880864)
Visitor Counter : 213