श्रम आणि रोजगार मंत्रालय

केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी राज्य विमा महामंडळाची 189 वी बैठक संपन्न

Posted On: 04 DEC 2022 8:25PM by PIB Mumbai

 

कर्मचारी राज्य विमा महामंडळाची 189 वी बैठक आज राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) मुख्यालयात केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या उपक्रमांची घोषणा करण्यात आली.

ईएसआय योजनेच्या कक्षेत येणार्‍या विमाधारक कामगार आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे सांगत, केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी कर्मचारी  विमा महामंडळाला पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर भर देण्याचे निर्देश दिले. त्यांनी पुढे सांगितले की, ईएसआयसी रुग्णालये आणि दवाखान्यांच्या पायाभूत सुविधांचे टप्प्याटप्प्याने बळकटीकरण आणि आधुनिकीकरण करण्यासाठी निर्माण से शक्तीउपक्रम सुरू करण्यात आला आहे. या बैठकीदरम्यान, श्रम आणि रोजगार राज्यमंत्री, रामेश्वर तेली, यांनी माहिती दिली की ड्रोन आणि ऑनलाइन डॅशबोर्ड वापरून प्रकल्पांच्या बांधकाम आणि देखरेखीसाठी ईएसआयसी द्वारे अद्ययावत  तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा प्रस्ताव आहे.

आरोग्य सेवा आणि लाभ सेवा वितरण यंत्रणा सुधारण्याच्या आणि ईएसआय योजनेच्या कक्षेत येणाऱ्या विमाधारक कामगारांच्या वाढत्या संख्येचे व्यवस्थापन करण्यासाठी ईएसआयसीची पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या दृष्टीकोनातून, ईएसआयसीने त्रिपुरा,आगरतळा येथील श्यामलीबाजार येथे आणि इडुक्की, केरळ येथे प्रत्येकी 100 खाटांचे नवीन ईएसआयसी रुग्णालय स्थापन करण्याच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. आगरतळा आणि इडुक्की येथील 100 खाटांची ही ईएसआयसी रुग्णालये प्रत्येकी 60 हजार लाभार्थ्यांच्या वैद्यकीय गरजा पूर्ण करतील.

या बैठकीदरम्यान भूपेंद्र यादव यांनी ईएसआयसीच्या- 'ईएसआय समाचार' या डिजिटल मासिकाच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन केले.

***

N.Chitale/V.Yadav/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1880845) Visitor Counter : 172


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu