राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा 4 व 5 डिसेंबर रोजी आंध्र प्रदेश दौरा
प्रविष्टि तिथि:
03 DEC 2022 6:46PM by PIB Mumbai
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 4 व 5 डिसेंबर रोजी आंध्र प्रदेशाला भेट देणार आहेत.
आंध्र प्रदेश सरकारने राष्ट्रपतींच्या सन्मानार्थ विजयवाडा इथे नागरी स्वागत समारंभाचे आयोजन केले आहे. त्या कार्यक्रमाला राष्ट्रपती 4 डिसेंबर 2022 रोजी उपस्थित राहतील. त्या दिवशी संध्याकाळी विशाखापटणम् इथे नौदल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला राष्ट्रपती उपस्थित राहतील आणि संरक्षण, रस्ते परिवहन आणि आदिवासी व्यवहार मंत्रालयांच्या विविध प्रकल्पांचे अथवा त्यांच्या बांधकामाचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करतील.
दुसऱ्या दिवशी 5 डिसेंबर 2022 रोजी राष्ट्रपती तिरुपती इथे असलेल्या श्री पद्मावती महिला विश्वविद्यालयाला भेट देऊन विद्यार्थिनी, शिक्षक व यशस्वी महिलांशी संवाद साधतील.
***
S.Kane/R.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1880723)
आगंतुक पटल : 247