सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

हंसराज अहिर यांनी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली

प्रविष्टि तिथि: 02 DEC 2022 7:51PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 डिसेंबर 2022

हंसराज गंगाराम अहिर यांनी आज राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. ते महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्याचे असून व्यवसायाने शेतकरी आहेत.

महाराष्ट्रातल्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून चार वेळा ते संसदेमध्ये निवडून गेले होते आणि त्यांनी महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सदस्यत्व देखील भूषवले आहे. संसदेच्या विविध स्थायी समित्यांचे ते सदस्य होते आणि संसदेच्या कोळसा आणि पोलादविषयक संसदीय स्थायी समितीचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. 16व्या लोकसभेच्या कार्यकाळात त्यांनी सरकारमध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्रीपद आणि रसायन आणि खत राज्यमंत्रीपद भूषवले.

 

  

 

 

 

 

N.Chitale/S.Patil/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(रिलीज़ आईडी: 1880575) आगंतुक पटल : 1260
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil