सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा 3 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय अपंग दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने होणार गौरव
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्था, संघटना आणि राज्य/जिल्हा इत्यादींना पुरस्कार प्रदान करण्यात येणार
Posted On:
02 DEC 2022 4:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 डिसेंबर 2022
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने 3 डिसेंबर 2022 रोजी नवी दिल्ली येथे विज्ञान भवनात आंतरराष्ट्रीय अपंग दिनानिमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्था, संघटना आणि राज्य/जिल्हा इत्यादींना या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते वार्षिक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. आंतरराष्ट्रीय अपंग दिनी म्हणजेच 3 डिसेंबर रोजी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अपंग(दिव्यांगजन) सक्षमीकरण विभागाकडून दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्था, संघटना आणि राज्य/जिल्हा इत्यादींना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
- सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन;
- श्रेष्ठ दिव्यांगजन;
- श्रेष्ठ दिव्यांग बालक/बालिका;
- सर्वश्रेष्ठ व्यक्ती– दिव्यांगजनांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत;
- सर्वश्रेष्ठ पुनर्वसन व्यावसायिक(पुनर्वसन व्यावसायिक/ कामगार) – दिव्यांगतेच्या क्षेत्रात कार्यरत;
- सर्वश्रेष्ठ संशोधन/ नवप्रवर्तन/उत्पाद/विकास–दिव्यांगतेच्या सक्षमीकरणाच्या क्षेत्रात;
- दिव्यांग सक्षमीकरणासाठी सर्वश्रेष्ठ संस्था(खाजगी संघटना, NGO);
- दिव्यांगांसाठी सर्वश्रेष्ठ नियोक्ता( सरकारी संघटना/पीएसईज/स्वायत्त मंडळे/ खाजगी क्षेत्र);
- दिव्यांगांसाठी सर्वश्रेष्ठ रोजगार मार्गदर्शक(प्लेसमेंट) संस्था– सरकारी./ राज्य सरकारी./स्थानिक स्वराज्य संस्था वगळून;
यासह विविध चौदा श्रेणींतर्गत, 2021 आणि 2022 या वर्षासाठी दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठीच्या राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
N.Chitale/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1880496)
Visitor Counter : 255