उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

23 व्या हॉर्नबिल महोत्सवाचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन

Posted On: 01 DEC 2022 9:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 डिसेंबर 2022

 

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज नागालँडची राजधानी कोहिमाजवळील किसामा येथील नागा हेरिटेज व्हिलेजमध्ये आयोजित 23 व्या हॉर्नबिल महोत्सवाचे उद्घाटन केले. उपराष्ट्रपतींनी नागालँडचे राज्यपाल आणि मंत्री यांच्या समवेत उद्घाटन समारंभाचा घंटा नाद करून "उत्सवांचा उत्सव" सुरु झाल्याची घोषणा केली.

उपराष्ट्रपती म्हणून धनखड यांचा नागालँडचा हा पहिलाच दौरा असून, उद्घाटन समारंभामध्ये सिफी (पारंपारिक नागा टोपी) आणि अमुला काक्सा (नागा शाल) देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

उपस्थितांना संबोधित करताना उपराष्ट्रपती म्हणाले की, भारत ही संस्कृतीची भूमी आहे आणि भारतीयांना त्यांच्या आदिवासी संस्कृतीचा अभिमान आहे.

नागा समुदायाची अनोखी संस्कृती आणि गौरवशाली इतिहासाची प्रशंसा करून धनखड म्हणाले, "मी आदिवासी संस्कृतीला सलाम करतो. आदिवासी ऊर्जेला सलाम करतो."

राज्याच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या निसर्ग सौंदर्याचे वर्णन करून ते म्हणाले की राज्यात पर्यटनाची मोठी क्षमता आहे आणि त्याचा पूर्ण क्षमतेने वापर व्हायला हवा.

देशात महिलांविरोधातल्या सर्वात कमी गुन्हेगारीचे प्रमाण असलेल्या नागालँडची प्रशंसा करून उपराष्ट्रपती म्हणाले की, हे राज्य महिला सक्षमीकरणाचा मार्ग दाखवत आहे.

आजपासून भारताने जी-20 परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारले आहे, असे नमूद करून धनखड म्हणाले की, पुढील वर्षी एप्रिलमध्ये राज्यात जी-20 ची बैठक होणार आहे, तेव्हा जगाला नागा आदरातिथ्य अनुभवता येईल. यावेळी उपराष्ट्रपतींनी महोत्सवाच्या स्मरणार्थ टपाल तिकिटाचे प्रकाशनही केले.

 

* * *

N.Chitale/R.Agashe/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1880400) Visitor Counter : 225