निती आयोग

अटल इनोवेशन मिशनने कम्युनिटी इनोव्हेटर फेलोशिपसाठी नवीन अर्ज केले जारी


अटल इनोव्हेशन अभियान, यांनी समुदाय नवोन्मेषक फेलोशिप साठी अर्ज मागवले आहेत.

Posted On: 01 DEC 2022 6:31PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 डिसेंबर 2022

 

समाजातील नवोन्मेषी संशोधकांना त्यांच्या उद्योजकता विषयक प्रवासात आवश्यक असलेले ज्ञानवर्धन  आणि  पायाभूत सुविधा पुरविण्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने  अटल इनोव्हेशन अभियान, नीती आयोग आणि यूएनडीपी इंडिया अर्थात संयुक्त राष्ट्रांचा भारतासाठीचा विकास कार्यक्रम यांनी आज मंगळवार,  1 डिसेंबर 2022 रोजी संयुक्तपणे समुदाय नवोन्मेषक फेलोशिप (CIF) साठी अर्ज जारी  करण्याची घोषणा केली, सध्या अटल समुदाय नवोन्मेषक केंद्राच्या कार्यक्रमात (ACIC) 22 समुदाय नवोन्मेषक आहेत.

समुदाय नवोन्मेषक म्हणजे उद्योजकतेची मानसिकता असलेली अशी व्यक्ती जो किंवा जी आपल्या उद्योजकतेच्या आधारे समाजातील समस्या सोडविण्यासाठी नवकल्पनांचा वापर करेल. हा अभ्यासक्रम  पाच टप्प्यांमध्ये विभागला असून अधिक माहितीसाठी अर्जदार  - https://aim.gov.in/acic-fellowship.php या लिंकला भेट देऊ शकतात.

अगदी सूक्ष्म स्तरावर स्टार्ट अप क्रांती भारतातील श्रेणी  2 आणि श्रेणी  3 शहरांमध्ये पोहोचली आहे आणि या क्षेत्रातील स्टार्ट अप परिसंस्था विकसित झाली आहे, असे अटल इनोवेशन  मिशनचे  मिशन डायरेक्टर डॉ. चिंतन वैष्णव, यावेळी म्हणाले. आरोग्य, शिक्षण, वित्तीय सेवा, कृषी यांसारख्या क्षेत्रातील  स्थानिक समस्यांचे मोठ्या प्रमाणात निराकरण करणे ही अटल इनोव्हेशन मिशनची  प्रमुख प्रेरक शक्ती आहे, त्यायोगे समाजाच्या  तळागाळातील स्थानिक समुदायाच्या समस्या सोडवणाऱ्या नवोदितांना सक्षम बनवले जाते. या अर्जाची घोषणा करतानाच आम्ही नवोदितांना समाजात बदल घडवून आणण्याच्या प्रवासातील अनुभव घेण्याचे आवाहन करत आहोत, असे त्यांनी सांगितले.

ही फेलोशिप म्हणजे एक वर्ष कालावधीचा कार्यक्रम असून एखादा  उदयोन्मुख समुदाय नवोन्मेषक त्याच्या सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीचे बंधन न बाळगता यात सहभागी होऊ शकतो. या अंतर्गत ज्ञान, मार्गदर्शन, अपरिचित समुदायात  मिसळून त्यांच्या समस्यांविषयी माहिती घेणे आणि समावेशन यांचा समावेश असून  पुरेशा पायाभूत सुविधा आणि निधीद्वारे प्रगती  होऊ शकेल असे अनुकूल वातावरण तयार करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

या फेलोशिपच्या कालावधीत, प्रत्येक विद्यार्थ्याला अटल इनोव्हेशन अभियानाच्या एका अटल कम्युनिटी इनोव्हेशन केंद्रामध्ये प्रवेश दिला जाईल आणि तेथे त्यांना त्यांच्या संकल्पनेवर काम करत असतानाच शाश्वत विकास ध्येयांविषयी जागृती, उद्योजकताविषयक कौशल्ये आणि जीवनविषयक कौशल्ये यांच्याविषयीचे ज्ञान दिले जाईल.

अटल इनोवेशन  मिशन (AIM ) देशभरात अटल कम्युनिटी इनोव्हेशन केंद्र  (ACIC) स्थापन करत आहे. सध्या 9 राज्यांमध्ये अशी 14 केंद्रे आहेत.  नजीकच्या भविष्यात या केंद्रांची  संख्या 50 वर नेण्यासाठी आणखी 36 केंद्रे सुरू केली जाणार आहेत.

फेलोशिपसाठी अर्ज करण्यासाठी लिंक:

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSd8v1_D8DntoHPr9rSL1rBSeBCF2cUKgt4k-h4AiOVGV6BFBA/viewform

About CIF: https://aim.gov.in/acic-fellowship-program-structure.php

 


* * *

N.Chitale/B.Sontakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1880336) Visitor Counter : 156


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu