युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 2022 साठीचे राष्ट्रीय क्रीडा आणि साहस पुरस्कार केले प्रदान

Posted On: 30 NOV 2022 9:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर 2022

प्रमुख ठळक मुद्दे:

  • टेबल टेनिसपटू शरथ कमल या वर्षी प्रतिष्ठेच्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराचा एकमेव मानकरी ठरला.
  • ऑलिम्पिक क्रीडा, पॅरालिम्पिक क्रीडा आणि डेफलिम्पिक खेळांमधील 25 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार मिळाले आहेत.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात यंदाचे (2022) राष्ट्रीय  क्रीडा आणि साहस पुरस्कार वितरीत केले. त्यात मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार आणि मौलाना अबुल  कलाम आझाद करंडक या 2022 च्या पुरस्कारांचे वितरण झाले. तेनझिंग नॉरगे राष्ट्रीय साहस पुरस्कार-2021 ही यावेळी प्रदान करण्यात आला.

केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री अनुराग सिंग ठाकूर, केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार राज्यमंत्री निशीथ प्रामाणिक यांच्यासह अनेक मंत्री यावेळी उपस्थित होते.

या वर्षी, राष्ट्रीय क्रीडा आणि साहस पुरस्कार, 2022 मध्ये एकूण 44 पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. पुरस्कार प्राप्त झालेल्या बहुतेक खेळाडूंना क्रीडा विभाग, युवा व्यवहार मंत्रालय आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाने टार्गेट ऑलिम्पिक पोडियम (टॉप) योजना आणि खेलो इंडिया योजना या माध्यमातून अनेक महिन्यांपासून पाठबळ दिले आहे. दिग्गज टेबल टेनिसपटू शरथ कमल या वर्षी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराचा एकमेव मानकरी आहे. शरथ डिसेंबर 2018 पासून टॉप योजनेचा एक भाग आहे. या योजनेद्वारे त्याला पायाभूत सुविधा आणि साहित्य याचे सर्वोत्तम प्रशिक्षण दिले जात आहे. यावर्षी ऑलिम्पिक क्रीडा, पॅरालिम्पिक क्रीडा आणि डेफलिम्पिक खेळांमधील 25 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार मिळाले आहेत. केंद्र सरकारच्या प्रमुख खेलो इंडिया योजनेने सुरवातीपासून या प्रतिभावान तरुणांना उत्तम दर्जापर्यंत पोहोचवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Kindly click for the details of Awardees

संबंधित लिंक

https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1875971

https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1878381

https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1879857

 

 

 

 

N.Chitale/P.Jambhekar/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 



(Release ID: 1880112) Visitor Counter : 218


Read this release in: English , Urdu , Hindi