युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेत्यांनी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन शहिदांना वाहिली आदरांजली
Posted On:
29 NOV 2022 8:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर 2022
ठळक मुद्दे:
- मुष्टियोद्धा निखत झरीन, बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन, एचएस प्रणॉय, स्टीपलचेसर अविनाश साबळे आणि बुद्धिबळपटू आर प्रज्ञानानंद आणि इतरांनी युद्ध स्मारकाला भेट दिली.
- वर्ष 2022 साठी, एक मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, 25 अर्जुन पुरस्कार आणि सात द्रोणाचार्य पुरस्कारांसह 40 हून अधिक क्रीडा पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
2022 च्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्याच्या एक दिवस आधी, अनेक पुरस्कारप्राप्त खेळाडू आणि प्रशिक्षकांनी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट दिली आणि शहीद जवानांना आदरांजली वाहिली.

मुष्टियोद्धा निखत झरीन, बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन, एचएस प्रणॉय, स्टीपलचेसर अविनाश साबळे आणि बुद्धिबळपटू आर प्रज्ञानानंद या प्रमुख खेळाडूंनी युद्ध स्मारकाला भेट दिली.या भेटीदरम्यान, पुरस्कार विजेत्यांनी वीरता चक्र (शौर्य चक्र ) इथे फेरफटका मारला.देशाला स्वातंत्र्यानंतर ज्या विविध ऐतिहासिक युद्धांचा सामना करावा लागला त्या संदर्भातील 6 कांस्य भित्तीचित्रे त्यांनी पाहिली.

वर्ष 2022 साठी, एक मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, 25 अर्जुन पुरस्कार आणि सात द्रोणाचार्य पुरस्कारांसह 40 हून अधिक क्रीडा पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
N.Chitale/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1879857)
Visitor Counter : 335