माहिती आणि प्रसारण मंत्रालय

53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा अर्थात इफ्फीतून विविधतेचं घडलेलं दर्शन म्हणजे 'वसुधैव कुटुंबकम' या मंत्राचं मूर्त स्वरुप होतं – माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांचं प्रतिपादन


'प्रादेशिक सिनेमा हा प्रादेशिकतेची सीमा ओलांडून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तराचा झाला आहे'

‘भारतात भविष्यातल्या चित्रपट उद्योगक्षेत्राला अनुकूल अशी चित्रिकरणासाठीची समृद्ध परिसंस्था उभारणं हेच आमचं उद्दिष्ट’

Posted On: 28 NOV 2022 8:18PM by PIB Mumbai

गोवा/मुंबई, 28 नोव्‍हेंबर 2022

 

चित्रपटांबदलचं अतिव प्रेम आणि अविट प्रशंसेची जोपसना करणाऱ्या आणि त्याला चालना देणाऱ्या 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा अर्थात इफ्फीचा दिमाखदार सांगता सोहळा, आज गोव्यातल्या डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये तारे तारकांच्या उपस्थितीत पार पडला. इफ्फीनं युवा आणि ज्येष्ठ, महोत्सवाला येणारे नवे उदयोन्मुख आणि ज्येष्ठ दिग्गज व्यक्तीमत्व अशा सर्वांसह इथल्या सर्वच प्रेक्षकांसाठी सिनेसृष्टीचं हे काहीसं दूर असलेलं जग खुलं करून दिलं आहे असं मत माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी या बहुरंगी बहुढंगी सोहळ्यात पाहुण्यांचं स्वागत करताना व्यक्त केलं.

'इफ्फीनं आपल्या सगळ्यांचं केवळ मनोरंजनच केले नाही, तर इफ्फीनं आपल्या सगळ्यांना नवी शिकवणही, इफ्फीनं आपल्यातल्या विनोद आणि तर्कबुद्धीला चालनाही दिली आणि सोबतच आपल्या संवेदनांनाही नवा आयाम दिला असं ते म्हणाले. 

"गेल्या नऊ दिवसांत, इफ्फीमध्ये एकूण 35,000 मिनिटांच्या अवधीचे 282 चित्रपट दाखवले गेले. यात एकूण 78 देशांमधले 65 आंतरराष्ट्रीय आणि 15 भारतीय भाषांमधले असे 183 आंतरराष्ट्ररीय, तर 97 भारतीय चित्रपट दाखवले गेले. यंदाच्या इफ्फीमध्ये मास्टरक्लासेस उपक्रमाअंतर्गतची 20 सत्रे, सभाषणसत्रां उपक्रअंतर्गत (इन-कन्व्हरसेशन सेशन्स) विविध संवाद सत्रे तसेच तारे तारकांसोबतच्या विविध उपक्रमांसारखे असंख्य अभिनव उपक्रम राबवले गेले. रसिकांना या सर्व उपक्रमांचा लाभ प्रत्यक्ष उपस्थितीत राहून तसंच ऑनलाईन पद्धतीनंही घेता आहे. या महोत्सवातून विविधतेचं घडलेलं दर्शन म्हणजे 'वसुधैव कुटुंबकम' या मंत्राचं मूर्त स्वरुप होतं, आणि यामुळेच जगभरातील सर्जनशील विचारवंत, चित्रपट निर्माते, सिनेप्रेमी आणि संस्कृती प्रेमींना एकाच छताखाली एकत्र आणलं, असं अनुराग ठाकूर यांनी यावेळी नमूद केलं.

 

प्रादेशिक सिनेमा आता प्रादेशिक राहिलेला नाही

प्रादेशिक सिनेमांवर अधिक भर देण्याच्या तसेच त्याच्या वाढीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा केंद्रीय मंत्र्यांनी पुनरुच्चार केला. प्रादेशिक सिनेमा आता प्रादेशिक राहिलेला नाही, तो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचला आहे, असेही त्यांनी सांगितले .  “या वर्षी आपण RRR, KGF सारख्या  इतर  अनेक चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकताना पाहिले आहे. अलीकडेच, भारतात बांगलादेश आणि मध्य आशियातील 80 हून अधिक तरुणांचा समावेश असलेले शिष्टमंडळ आले होते. त्यांना केवळ  हिंदी चित्रपटातील  गाणी आणि प्रादेशिक चित्रपटांमधील  गाणी ऐकायची होती. देशाची सीमा ओलांडून परदेशात  लोकप्रिय झालेले मिधुन चक्रवर्तीपासून ते अक्षय कुमार आणि चिरंजीवी पर्यंत सर्व  चित्रपटांचा त्यांनी उल्लेख केला. जर आशय उत्तम असेल  असेल, तर तो एका विशिष्ट प्रदेशापुरता मर्यादित राहत नाही. "

 

भारतात  समृद्ध चित्रीकरण परिसंस्था उभारण्याच्या  दिशेने

इफ्फीचे अशा एका व्यासपीठात रूपांतर  झाले आहे जिथे कल्पनांचा उदय होतो आणि जिथे सिनेमॅटिक नावीन्यपूर्ण सादरीकरण दाखवले जाते, जिथे सहकार्य  आणि सह-निर्मितीला सुरुवात होते, आणि अनुभव सामायिक केले जातात.  एक अशी जागा जिथे अनेक पिढयांना अविस्मरणीय आनंद मनमुरादपणे घेता यावा यासाठी चिरंतन सिनेमा उदयाला  येतो असे ते पुढे म्हणाले. यापुढील इफ्फी महोत्सवाच्या आयोजनाचा विचार करता, भारतामध्ये एक समृद्ध चित्रीकरण परिसंस्था  आणि भविष्यासाठी सज्ज उद्योग उभारणे हे आमचे उद्दिष्ट असून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा याला पूर्ण पाठिंबा राहील.

सिनेमातील प्रतिभा आणि शैली याबाबत बोलताना अनुराग ठाकूर म्हणाले की आज, चित्रपट जग नवोदित  प्रतिभेने गजबजले आहे, नाट्यशाळा, लहान-स्वतंत्र प्रॉडक्शन हाऊसेस आणि भारताच्या दुर्गम  भागातून आपला आवाज शोधत आहेत. व्यासपीठ  नवीन आहेत, मग ते तुमच्या मोबाईलवरील लघुपट असोत, प्रत्यक्ष सिनेमागृहात जाऊन  चित्रपट पाहणे असो किंवा ओटीटी वर पाहणे असो , अविश्वसनीय प्रतिभेला ओळख मिळत आहे हे आपण पाहतो आहोत,  प्रेक्षकांना आकर्षित करत आहे आणि चाहत्यांना देखील आवडत आहे आणि उत्तम व्यवसायही करत आहेत !

क्रिकेट, कबड्डी, हॉकी इत्यादी क्रीडा प्रकारांमधील उदयोन्मुख खेळाडूंसाठी विविध  लीगने जे केले आहे, तसेच  आता सिनेमाच्या बाबतीत घडत आहे, असे त्यांनी सूचित केले. “भारतात प्रतिभावंतांची कधीच कमतरता नव्हती.  केवळ प्रेक्षकांकडून यशाची दाद मिळावी यासाठी त्यांना संधी हवी होती . ”

डिजीटल इंडियाने चालना दिलेल्या नवोन्मेषाबद्दल बोलताना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणाले की  ‘डिजिटल इंडिया’मुळे परवडणारे हँडसेट आणि स्वस्त डेटा यामुळे चालना मिळून विविध शैलींचे चित्रपट केवळ वैयक्तिक प्रतिभेच्या आधारावर जगासमोर ताकदीच्या आणि मनमोहक कथा सादर करण्यासाठी उत्तुंग भरारी घेत आहेत.

 

चित्रपट निर्मिती क्षेत्रात इस्रायलसोबत नवी भागीदारी

फौदा ही समीक्षकांनी प्रशंसा केलेल्या   इस्त्रायली मालिकेचा चौथा सीझन त्याच्या जागतिक प्रिमिअरच्या बराच आधी 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) प्रदर्शित करण्यात आला. फौदा  ही  नेटफ्लिक्स मालिका भारतात लोकप्रिय  ठरली आहे. त्यांच्या चौथ्या हंगामाच्या इफ्फी  प्रीमियर दरम्यान तिचे जोरदार स्वागत करण्यात आले आहे. 53 व्या इफ्फीसाठी गोव्यात आल्याबद्दल त्यांनी इस्रायलचे राजदूत नाओर गिलॉन यांचे आभार मानले.

फौदा टीमचा सत्कार करताना ते  म्हणाले की, भारत आणि इस्रायलचे अतिशय खास नाते आहे. “आमच्या शेजाऱ्यांच्या बाबतीत वाद आहेत. मात्र तरीही , आपला हजारो वर्षांचा इतिहास आहे, आपण अनेक क्षेत्रांमध्ये, विशेषत: सुरक्षिततेच्या क्षेत्रात एकत्र काम करत आहोत.

इस्रायलच्या स्टार्टअप इकोसिस्टमचा गौरव करताना केंद्रीय मंत्र्यांनी  चित्रपट आणि चित्रपट निर्मिती क्षेत्रात इस्रायलसोबत नवीन भागीदारी करण्याचा विश्वास व्यक्त केला. “इस्रायलबरोबर सह-निर्मिती आणि सहकार्य असायला हवे. . नजीकच्या काळात  भारत हे जगाचे कंटेंट हब असेल. ज्या कथा जगाला सांगितल्या गेल्या  नाहीत अशा कथांवर आधारित चित्रपट निर्मितीसाठी सहयोग करण्याची आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची  हीच योग्य वेळ आहे. यासाठी भारत हे ठिकाण आहे आणि इस्रायल योग्य भागीदार आहे. असे ते पुढे म्हणाले.

इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित  तेलुगू अभिनेता चिरंजीवीचे अनुराग ठाकूर यांनी अभिनंदन केले. ते म्हणाले, गेली जवळपास चार दशकांची त्यांची शानदार कारकीर्द आहे , ज्यात 150 हून अधिक चित्रपटात अभिनय करून त्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे.

 

* * *

PIB Mumbai | G.Chippalkatti/Sushma/Tushar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1879634) Visitor Counter : 263