नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयआरईडीए ने साजरा केला 'संविधान दिन'

Posted On: 27 NOV 2022 4:39PM by PIB Mumbai

 

 

आयआरईडीएने 'संविधान दिन' साजरा केला

इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लि. (IREDA) ने शनिवारी 26 नोव्हेंबर 2022 रोजी, "भारतीय संविधान, भारताची कल्पना" या विषयावर वेबिनार आयोजित करून संविधान दिन साजरा केला. संविधान दिन, "राष्ट्रीय कायदा दिवस" म्हणूनही ओळखला जातो. भारतात दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी संविधानाचे महत्त्व आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बी.आर. आंबेडकर यांचे विचार आणि कल्पनांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने संविधान दिन साजरा केला जातो.

या वेबिनारचे संचालन मध्य प्रदेशातील भोपाळ येथील यंगशाळाचे सदस्य तसेच राजस्थानातील स्कूल फॉर डेमोक्रसी (लोकतंत्रशाळा) चे माजी संवैधानिक मूल्य सहसंशोधक नितेश व्यास यांनी केले. व्यास यांनी भारतीय संविधानातील संवैधानिक मूल्ये आणि मूलभूत तत्त्वांचे महत्त्व आणि सध्याच्या काळात त्याची प्रासंगिकता यावर भर दिला.

इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकांनी कंपनीच्या सर्व अधिकाऱ्यांना दूरदृश्य प्रणाली मार्फत संबोधित केले. " स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता या संविधानात दिलेल्या चार आदर्शांना आत्मसात करणे आणि ते अंमलात आणणे हाच संविधान दिन साजरा करण्याचा खरा हेतू आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. जर आपण आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात ही तत्त्वे अमलात आणण्याचा प्रयत्न करत राहिलो आणि या भावनेशी प्रामाणिक राहिलो, तर भविष्यातही भारतात संविधानाचा अंमल राहू शकतो, असेही ते म्हणाले.

या वेबिनारला इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लि. च्या तांत्रिक विभागाचे संचालक आणि इतर अधिकारी दूरदृश्य प्रणाली मार्फत उपस्थित होते. वेबिनार नंतर उपस्थितांना भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेची प्रतिज्ञा देण्यात आली.

***

S.Patil/S.Mukhedkar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1879353)