वस्त्रोद्योग मंत्रालय

भारताच्या उपराष्ट्रपतींकडून सोमवार दिनांक, 28 नोव्हेंबर 2022 रोजी श्रेष्ठ कारागीरांना शिल्प गुरू आणि राष्ट्रीय पुरस्कार पुरस्कार प्रदान केले जाणार


केंद्रीय वस्त्रोद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, या समारंभाच्या अध्यक्षस्थानी

शिल्प गुरू आणि राष्ट्रीय पुरस्कारांचा उद्देश हस्तकला क्षेत्रातील उत्कृष्ट कारागिरांचा सन्मान  करणे, हा आहे

Posted On: 27 NOV 2022 2:34PM by PIB Mumbai

 

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाद्वारे सोमवार, दिनांक 28 नोव्हेंबर 2022 रोजी 2017, 2018 आणि 2019 या वर्षांतील कुशल हस्तकला कारागिरांना 'शिल्प गुरू' आणि 'राष्ट्रीय पुरस्कार' देण्याच्या समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

उपराष्ट्रपती श्री जगदीप धनखर हे या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आहेत. केंद्रीय वस्त्रोद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल या समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील. रेल्वे आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री श्रीमती दर्शना विक्रम जरदोश या देखील कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आहेत.

विकास आयुक्त कार्यालय (हस्तकला) 1965 पासून कुशल कारागिरांसाठी राष्ट्रीय पुरस्कार योजना राबवत आहे आणि 2002 मध्ये शिल्प गुरू पुरस्कार सुरू करण्यात आले. ज्यांनी आपल्या कार्याने आणि समर्पणाने हस्तकलेसाठी योगदान दिले आहे अशा दिग्गज कारागिरांना दरवर्षी हे पुरस्कार प्रदान केले जातात. देशातील समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हस्तकला वारसा जतन करण्यासाठीच नव्हे तर संपूर्ण हस्तकला क्षेत्राच्या पुनरुत्थानासाठी देखील, हस्तकला क्षेत्रातील उत्कृष्ट कारागिरांना मान्यता देणे, हा या पुरस्कारामागचा प्रमुख उद्देश आहे. पुरस्कार विजेते देशातील जवळपास सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांचे तसेच वेगवेगळ्या ठिकाणच्या विविध कलाकुसरीचे प्रतिनिधित्व करतात.

कोविड महामारीमुळे गेल्या तीन वर्षांपासूनचे न दिले गेलेले पुरस्कार उद्या एकत्रितपणे प्रदान केले जात आहेत.

हस्तकला क्षेत्र देशाच्या अर्थव्यवस्थेत वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्त्वाची भूमिका बजावते. यातून ग्रामीण आणि निमशहरी भागात मोठ्या प्रमाणात कारागीरांना रोजगार मिळतो आणि सांस्कृतिक वारसा जतन करत देशाला भरीव परकीय चलनही लाभते. हस्तशिल्प क्षेत्र रोजगार निर्मिती आणि निर्यातीत भरीव योगदान देत असते.

***

S.Pophale/S.Patgoankar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1879307) Visitor Counter : 202