संसदीय कामकाज मंत्रालय
केंद्रीय संसदीय व्यवहार मंत्रालयातर्फे संविधान दिन 2022 साजरा
Posted On:
26 NOV 2022 3:01PM by PIB Mumbai
भारताने राज्यघटनेचा स्वीकार केल्याप्रीत्यर्थ तसेच भारतीय राज्यघटनेच्या संस्थापकांच्या योगदानाचा सन्मान करण्याच्या उद्देशाने आज संपूर्ण भारतात अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने संविधान दिवस (राज्यघटना दिन) साजरा करण्यात येत आहे.
केंद्रीय संसदीय व्यवहार मंत्रालयातील पदाधिकारी तसेच इतर अधिकारी यांनी आज नवी दिल्ली येथे संसद भवनात केंद्रीय संसदीय व्यवहार मंत्रालय सचिवांच्या नेतृत्वाखाली भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.

या राष्ट्रीय कार्यक्रमातील सक्रीय सहभागी म्हणून संसदीय व्यवहार मंत्रालयाने दोन सुधारित तसेच अद्ययावत डिजिटल पोर्टल्स कार्यान्वित केली आहेत. यापैकी (https://constitutionquiz.nic.in/) हे पोर्टल राज्यघटनेची उद्देशिका इंग्रजी तसेच राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचित नमूद केलेल्या 22 इतर भाषांतून वाचण्यासाठी उपयुक्त आहे तर (https://constitutionquiz.nic.in/) हे दुसरे पोर्टल “भारतीय राज्यघटनेवर आधारित ऑनलाईन प्रश्नमंजुषे”त भाग घेण्यासाठी तयार केले आहे. केंद्रीय संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी 25 नोव्हेंबर 2022 रोजी या दोन सुधारित तसेच अद्ययावत डिजिटल पोर्टल्सच्या कार्याला सुरवात करून दिली.
या दोन्ही उपक्रमात सहभागी होण्यासाठी आणि सहभाग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी देशभरातील जनता मोठ्या प्रमाणात कुतूहल आणि उत्साह दाखवत आहे.
***
S.Tupe/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1879068)