माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner

विख्यात ऍनिमेटर डॉ. क्रिस्टिअन जेझडिक यांनी ऍनिमेशन आयपी वर काम करण्याचा सल्ला दिला


'ऍनिमेशन टीव्ही मालिका बनवण्यासाठी मूळ कल्पना असणे गरजेचे'

गोवा/मुंबई, 25 नोव्‍हेंबर 2022

 

"अ‍ॅनिमेशन मालिकेसाठी पटकथा लेखन अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पुस्तकांमध्ये वापरलेली लेखी भाषा पटकथेच्या भाषेपेक्षा खूप वेगळी असते, कॉमिक बुक किंवा इतर कोणत्याही कथेवर ऍनिमेशनपट बनवण्यापूर्वी त्याचा अनुवाद करण्यासाठी विशिष्ट लोकांची आवश्यकता असते", असे बीईक्यू एंटरटेनमेंटचे सीईओ डॉ. क्रिस्टिअन जेझडिक म्हणाले. 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने ''हाउ टू पिच युवर एनिमेशन आयपी' या विषयावरील मास्टरक्लासला ते संबोधित करत होते.

ऍनिमेशन शो बनवण्याचा खर्च खूप आहे, अशी माहिती डॉ.जेझडिक यांनी दिली. 26 मिनिटांच्या ऍनिमेशन शोचा खर्च 7-10 दशलक्ष डॉलर्स असू शकतो. निर्माते, दिग्दर्शक, रंगकर्मी, पटकथा लेखक शोधणे महत्त्वाचे आहे. मात्र मूळ कल्पना असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

90 च्या दशकातल्या व्हिडिओ गेम्स, व्हीएफएक्स, अॅनिमेशन उद्योगाच्या प्रगतीबाबत डॉ. जेझडिक म्हणाले, ही वाढ उल्लेखनीय आहे आणि ती केवळ युरोप आणि अमेरिकेमध्येच नव्हे तर भारतातही पारंपारिक उद्योगाची जागा घेत आहे. “मी 90 च्या दशकात वेगवेगळ्या कंपन्यांसोबत भारतात येत असे. आता आम्ही पुणे, बंगळुरू , कोलकाता, दिल्ली मधील अनेक कंपन्यांसोबत सक्रियपणे काम करत आहोत.”, असे त्यांनी सांगितले.

संभाव्य वित्त पुरवठादार, निर्माते, प्रसारक आणि इतर भागधारकांना ऍनिमेशन मालिकेच्या कल्पना सादर  करण्याबाबत डॉ. क्रिस्टिअन जेझडिक यांनी केलेल्या सूचना पुढीलप्रमाणे आहेत.

  • ऍनिमेशन टीव्ही मालिका बनवण्यासाठी मूळ कल्पना असणे गरजेचे आहे.
  • तुमचे अॅनिमेशन आयपी कशाबद्दल आहेत ? - सण की विशिष्ट बाजारपेठ. युरोपमध्ये, कार्टून फोरममध्ये एक हजाराहून अधिक निर्माते आणि प्रसारक त्यांचे प्रकल्प मांडण्यासाठी  जातात. तेव्हा, सर्वप्रथम कोणत्याही ब्रॉडकास्टरला किंवा अगदी YouTube ला भेटा
  • तुमचा सेटअप निवडा. शक्य असल्यास संभाव्य वित्तपुरवठादारासमोर लिखित सामुग्री वाचणे टाळा. विषय लक्षात ठेवण्याच्या तुमच्या पद्धती शोधा.
  • सादरीकरणासाठी आवश्यक घटक :
    • तुमच्या संकल्पनेचा मतितार्थ तीन ओळींमध्ये मांडा : संकल्पना, पात्र, परिदृश्य
    • एक ट्रेलर दाखवा जो छोटा आणि चांगल्या प्रकारे बनवला असेल
    • ट्रेलरमध्ये तुमच्या पात्रांची ओळख करून द्या
    • तुम्हाला कथा माहीत आहे हे सिद्ध करण्यासाठी एक कथानक जवळ ठेवा
    • सादरीकरण करताना तुमची कथा वाचा - तुमच्या मनात काय आहे ते दाखवा
    • एखाद्या डिझाइन/शैलीचा विचार करा, कारण एक कल्पना अनेक प्रकारे  मांडता  येते
    • कामाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक बजेट जाणून घ्या
    • तुमची टीम आणि भागीदारांबाबत आधीच विचार करा 


* * *

PIB Mumbai | S.Tupe/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

iffi reel

(Release ID: 1879040) Visitor Counter : 187


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu