मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
"भारतातील श्वेत क्रांतीचे जनक" यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त, पशुसंवर्धन विभाग बंगळुरू येथे राष्ट्रीय दूध दिवस साजरा करणार
प्रविष्टि तिथि:
25 NOV 2022 4:41PM by PIB Mumbai
"स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा" एक भाग म्हणून पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग "भारतातील श्वेत क्रांतीचे जनक" डॉ. वर्गीस कुरियन यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त 26 नोव्हेंबर 2022 रोजी बंगळुरू येथे "राष्ट्रीय दूध दिवस" साजरा करणार आहे. या कार्यक्रमादरम्यान प्रतिष्ठित राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2022 देखील प्रदान केले जातील.
कर्नाटक राज्यात हा संस्मरणीय राष्ट्रीय कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग, भारत सरकार, पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय विभाग, कर्नाटक राज्य सरकार, राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ आणि कर्नाटक दूध महासंघ यांनी परस्पर सहकार्य केले आहे.
भारत सरकारच्या मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाचे राज्यमंत्री डॉ. संजीव कुमार बल्यान हे कर्नाटक बोवाइन IVF-(इनव्हिट्रो-फर्टिलायझेशन) येथील सेंट्रल फ्रोजन वीर्य उत्पादन आणि प्रशिक्षण संस्था हेसेराघट्टा आणि सेंट्रल कॅटल ब्रीडिंग फार्म, हेसेराघट्टा, बेंगळुरू येथे दूरदृश्य प्रणाली मार्फत प्रगत प्रशिक्षण सुविधेची पायाभरणी करतील.
या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते वर्गीस कुरियन यांच्या जीवनावरील एक पुस्तक तसेच दूध भेसळ यावरील पुस्तिकेचेही प्रकाशन होणार आहे.
***
S.Kane/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1878852)
आगंतुक पटल : 615