राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरू तेग बहादूरजी यांच्या हौतात्म्य दिनाच्या पूर्वसंध्येला दिला संदेश

Posted On: 23 NOV 2022 5:46PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर 2022

गुरू तेग बहादूरजी यांच्या हौतात्म्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संदेश दिला आहे. त्यांनी म्हटले आहे,

गुरू तेग बहादूर यांच्या हौतात्म्य दिनानिमित्त मी त्यांना आदरांजली वाहते.

गुरू तेग बहादूर यांनी त्यांचे आयुष्य धर्मासाठी वेचले. 'सिर दिया पर सार ना दिया', हे त्यांच्याबद्दल यथोचितपणे बोलले जाते. त्यांचा त्याग येणाऱ्या काळात कायम स्मरणात राहील.

त्यांना 'हिंद की चादर' असेही म्हटले जाते कारण त्यांचे हौतात्म्य हे मानवतेसाठी त्यांनी केलेला त्याग आहे.

एकता आणि बंधुत्वाची गुरू तेग बहादूरजी यांची शिकवण आत्मसात करण्याची प्रतीज्ञा आपण सगळ्यांनी घेऊया.

राष्ट्रपतींचा संदेश हिंदीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 

S.Tupe/P.Jambhekar/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1878287) Visitor Counter : 143