माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner

इफ्फी मधील केंद्रीय संचार ब्युरोच्या प्रदर्शनात चित्रपटांमध्ये दर्शविलेल्या स्वातंत्र्य चळवळीचे चित्रण

गोवा/मुंबई, 21 नोव्‍हेंबर 2022

 

यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव  (इफ्फी) मध्ये तंत्रज्ञान प्रदर्शन हा  एक नवीन उपक्रम सुरु झाला असून, केन्द्रीय जनसंपर्क कार्यालयाचे (सीबीसी) " स्वातंत्र्य चळवळ आणि चित्रपट" हे प्रदर्शन   अद्वितीय आणि अविस्मरणीय अनुभवामुळे लोकांच्या आकर्षणाचे स्थान बनले आहे.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्या हस्ते  कम्पाल फुटबॉल मैदानावरील मल्टी-मीडिया डिजिटल प्रदर्शनाचे उद्घाटन आज झाले. हे प्रदर्शन विविध तांत्रिक अविष्कारांच्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची संपूर्ण गाथा सांगते, असे अनुराग ठाकूर म्हणाले. या प्रदर्शनाला भेट देणाऱ्या प्रत्येकासाठी हा एक प्रेरणास्रोत ठरेल, विशेषतः विद्यार्थ्यांना आपल्या प्रेरणादायी नेत्यांबाबत पुष्कळ माहिती मिळेल, असे  त्यांनी सांगितले.

   

केन्द्रीय जनसंपर्क कार्यालयाच्या  पथकाने  ‘स्वातंत्र्याचा  अमृत महोत्सव’ या व्यापक संकल्पनेअंतर्गत प्रदर्शनाची संकल्पना कॅमेरा-लेन्सच्या रूपात एका दर्शनी भागावर मांडली आहे. प्रदर्शन हॉलमध्ये प्रवेश करताच, एका मोठ्या 12 x 10 फूट एलईडी स्क्रीनवर  लोकप्रिय दूरदर्शन मालिका 'स्वराज' ची झलक दिसते, ज्यामध्ये वसाहतवादी राजवटीविरुद्ध लढा देणाऱ्या विविध स्वातंत्र्यसैनिकांचे  जीवन आणि योगदान यांचे चित्रण केले आहे.

   

जरा आणखी पुढे गेल्यावर 1857 चे स्वातंत्र्ययुद्ध, राजा राम मोहन रॉय, नेताजी सुभाषचंद्र बोस, कालापानी, भगतसिंग आणि चंद्रशेखर आझाद यांचे स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित दुर्मिळ फुटेज प्रदर्शित केले आहेत. यातील बहुतेक फुटेज फिल्म्स डिव्हिजनच्या समृद्ध संग्रहातून प्राप्त  आहेत.

   

केन्द्रीय जनसंपर्क कार्यालयाने डिजिटल फ्लिप-पुस्तकाच्या माध्यमातून सादर  केलेल्या पोस्टर्सच्या रूपात भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा कालक्रमानुसार प्रवास उलगडत जातो. स्वातंत्र्य संग्रामाचा आवाज बनलेली अनेक स्फूर्तिदायक गीते येथे ऐकता येतात तर साऊंड शॉवर द्वारे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सेनानींची भाषणे देखील आपल्या कानावर पडतात.

नेताजींसोबत कदम बढाये जा’- मार्च हा एक उत्तुंग  वास्तव अनुभव आहे, जिथे कोणीही नेताजी सुभाष चंद्र बोस या भारताच्या प्रेरणादायी नेत्यासोबत आझाद हिंद सेनेच्या   गणवेशात मार्च करू शकतो आणि स्वतःची  प्रतिमा घेऊ शकतो.

1857 च्या स्वातंत्र्ययुद्धावरील इमर्सिव्ह थिएटर हा एक अनोखा अनुभव आहे जो पाहण्यासारखा आणि प्रत्यक्ष अनुभवण्यासारखा आहे,  आभासी पण  वास्तविकतेचा अनुभव देणारा मंच  तुम्हाला काकोरी ट्रेन घटना एका  नवीनपद्धतीने दृश्यरूपात पाहायला  मदत करतो.

फ्लिप पोस्टर प्रदर्शनात स्वातंत्र्यलढ्याने प्रेरित झालेल्या आणि राष्ट्र उभारणीत योगदान दिलेल्या चित्रपटांचे चित्रण केले आहे. उदयकाल, उपकार, मदर इंडिया, बोस, द फॉरगॉटन हिरो ही यापैकी काही उदाहरणे आहेत.

सीबीसी  प्रदर्शनात आझादी क्वेस्ट गेम आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या जीवनावर  नव्याने सुरू झालेली Netflix अॅनिमेशन मालिका देखील प्रदर्शित करण्यात आली आहे.

प्रदर्शनाचा  दर्शनी (डिस्प्ले) भाग डिस्कव्हरीच्या  जर्नी ऑफ इंडियाने संपतो,  ज्यामध्ये देशाने बहुआयामी क्षेत्रात कशी प्रगती केली आहे याची कथा सांगितली आहे.

प्रदर्शन हॉलच्या मध्यभागी जालियनवाला बाग येथील प्रतीकात्मक शहीदी  कुंवा किंवा हुतात्म्यांची विहीर आहे, जिथे आपण स्वातंत्र्यसंग्रामातील ज्ञात  अज्ञात वीरांना आदरांजली वाहू शकतो.

* * *

PIB Mumbai | G.Chippalkatti/B.Sontakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

iffi reel

(Release ID: 1877745) Visitor Counter : 267