अर्थ मंत्रालय

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधीच्या (एनआयआयएफ) प्रशासकीय परिषदेची पाचवी बैठक


एनआयआयएफ मध्ये सर्वाधिक भागीदारी असलेल्या पायाभूत सुविधा क्षेत्रातील दोन बिगर-बँकिंग अर्थ कंपन्यांनी (एनबीएफसी), कोणत्याही अनुत्पादित कर्जाशिवाय (एनपीएल) 3 वर्षात त्यांच्या एकत्रित कर्ज पुस्तकात ₹4,200 कोटी वरून ₹26,000 कोटी इतकी वाढ नोंदवली

Posted On: 17 NOV 2022 6:03PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर 2022

केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली काल (16 नोव्हेंबर 2022) संध्याकाळी उशिरा नवी दिल्ली येथे, नॅशनल इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर फंड अर्थात, राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधी (एनआयआयएफ) च्या प्रशासकीय परिषदेची 5 वी बैठक आयोजित करण्यात आली होती.     

एनआयआयएफ च्या निधीमध्ये भारत सरकारच्या बरोबरीने गुंतवणूक करणाऱ्या जागतिक आणि देशातील अनेक प्रतिष्ठित गुंतवणूकदारांच्या पाठिंब्यामुळे एनआयआयएफ हे, आंतरराष्ट्रीय स्तरावर विश्वासार्ह आणि व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य गुंतवणूक व्यासपीठ म्हणून विकसित झाल्याचे प्रशासकीय परिषदेने यावेळी नमूद केले.

'जीओएल' च्या योगदानासह असलेला एनएयआयएफ चा भारत जपान निधी हा नॅशनल इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर फंड लिमिटेड (एनआयआयएफएल) आणि जपान बँक फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट (जेबीआयसी) यांच्यातील सामंजस्य कराराद्वारे प्रस्तावित करण्यात आला आहे. या सामंजस्य करारावर 9 नोव्हेंबर, 2022 रोजी स्वाक्षरी करण्यात आली. एनआयआयएफ च्या द्विपक्षीय गुंतवणुकीबाबतच्या या महत्त्वाच्या घडामोडीला प्रशासकीय परिषदेने मान्यता दिली.

एनआयआयएफ मध्ये सर्वाधिक भागभांडवल असलेल्या पायाभूत सुविधा क्षेत्रातील दोन बिगर-बँकिंग आर्थिक कंपन्यांनी (एनबीएफसी) त्यांच्या एकत्रित कर्ज पुस्तकात गेल्या 3 वर्षात, आतापर्यंत कोणत्याही अनुत्पादित कर्जाशिवाय (एनपीए) ₹4,200 कोटी वरून ₹26,000 कोटी इतकी वाढ नोंदवली, याची प्रशासकीय परिषदेने प्रशंसा केली.

अर्थमंत्र्यांनी एआयआयएफ च्या पथकाला आवाहन केले की, त्यांनी गुंतवणूक करण्यायोग्य ग्रीनफिल्ड आणि ब्राउनफिल्ड गुंतवणूक प्रकल्पांचा समावेश असलेल्या पीएम गतीशक्ती आणि राष्ट्रीय पायाभूत सुविधा कॉरिडॉर यासारख्या राष्ट्रीय पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करावी आणि या संधींसह व्यावसायिक भांडवलात भर घालावी.

प्रशासकीय परिषदेचे सचीवडी/ओ आर्थिक व्यवहार अजय सेठ, सचीव, डी/ओ आर्थिक सेवा  विवेक जोशी, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) चे अध्यक्ष दिनेश खारा, डीएसपी संघाचे अध्यक्ष हेमेंद्र कोठारी आणि मणिपाल ग्लोबलचे अध्यक्ष मोहनदास पै, हे प्रशासकीय परिषदेचे सदस्य या बैठकीला उपस्थित होते.   

 

S.Bedekar/R.Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 



(Release ID: 1876841) Visitor Counter : 157