पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी कॉप 27 मध्ये "विकसनशील देशांमधील लहान बेटांवरील प्रतिरोधक पायाभूत सुविधांना गती देणे " या विषयावरील सत्रात घेतला भाग

Posted On: 17 NOV 2022 5:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर 2022

कॉप 27 च्या पार्श्वभूमीवर यूएनएफसीसीसी  (UNFCCC- युनाइटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्वेन्शन ऑन क्लायमेट चेंज ) दालन  येथे आज  ''विकसनशील देशांमधील लहान बेटांवरील प्रतिरोधक  पायाभूत सुविधांना गती देणे " (एसआयडीएस ) या विषयावर  आयोजित करण्यात आले होते.  भारताचे केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव, मॉरिशसचे पर्यावरण, घनकचरा आणि हवामान बदल मंत्री कावे  रामानोसिनेटर मॅथ्यू समुदा, आर्थिक वाढ आणि रोजगार निर्मिती मंत्रालय, जमैका आणि  फिजी आणि एओएसआयएस( अलायन्स ऑफ स्मॉल आयलंड स्टेट्स ) यांचे   प्रतिनिधी या सत्रात सहभागी झाले होते.

आयआरआयएस (द्वीप राष्ट्रांसाठी प्रतिरोधक पायाभूत सुविधा )दृष्टिकोन  सादर करणे आणि पहिल्या ‘कॉल फॉर प्रपोझल्स’ची घोषणा करणे, हा या सत्राचा मुख्य विषय होता. आयआरआयएस  व्हिजन 2022-2030 वर हे सत्र केंद्रित होते आणि पहिल्या 'कॉल फॉर प्रपोझल्स' अंतर्गत आयआरआयएस  प्रकल्पांची अंमलबजावणी सुलभ करणारे प्रमुख सक्षम घटक  दर्शवणारे होते. आयआरआयएसहा पहिला उपक्रम असेल जो आयआरएएफ अर्थात   प्रतिरोधक पायाभूत सुविधा गतीवर्धक  निधी  द्वारे कार्यान्वित केला जाईल.  याचा प्रारंभ सीडीआरआयने (आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा आघाडीने  गेल्या आठवड्यात COP 27 मध्ये सुरू केला होता.

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी आपल्या भाषणात, आयआरआयएस हा एक प्रमुख धोरणात्मक उपक्रम असून  सर्वात असुरक्षित असलेल्या विकसनशील लहान द्वीपराष्ट्रांना  प्रतिरोधक  आणि हवामान अनुकूल उपाय साध्य करण्यासाठी आणि कार्यान्वित  करण्यासाठी एक साधन म्हणून आखण्यात आला असल्याचे सांगितले.

भारताला 7500 किमी पेक्षा जास्त किनारपट्टी आणि लगतच्या  समुद्रात 1000 पेक्षा अधिक बेटे लाभली असून  भारताच्या किनारपट्टीवर  उपजीविकेसाठी समुद्रावर अवलंबून असलेली मोठी  लोकसंख्या राहत आहे. यामुळे मोठे धोके असलेल्या देशांमध्ये  जागतिक स्तरावर भारत मोडतो.  फक्त उदाहरण  द्यायचे झाल्यास, 1995 ते 2020 दरम्यान, भारतात हवामानासंदर्भात 1058 आपत्तीची  नोंद झाली, अशी माहिती त्यांनी दिली.

वसुधैव कुटुंबकम - संपूर्ण जग एक कुटुंब आहे - यावरील विश्वास आयआरआयएसच्या माध्यमातून भारत कृतीत आणत आहे आणि सर्वांसाठी एक चांगला आणि सुरक्षित ग्रह बनवण्यासाठी भागीदारांसोबत हवामान बदलाला तोंड देण्याची आपली वचनबद्धता दर्शवित आहे,असे यादव यांनी सांगितले.

 सीडीआरआय  आणि आयआरआयएसबद्दल

आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा आघाडीची  ( सीडीआरआय  ) सुरुवात सप्टेंबर 2019 मध्ये  पंतप्रधानांनी न्यूयॉर्क येथे  केली. शाश्वत विकासाच्या समर्थनार्थ हवामान आणि आपत्ती जोखमींसाठी रोधक नवीन आणि विद्यमान पायाभूत सुविधांना  प्रोत्साहन देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. मूलभूत सेवांमध्ये सार्वत्रिक विस्तार, समृद्धी आणि  अनुरूप कामासाठी प्रोत्साहन  या शाश्वत विकास उद्दिष्टांच्या अत्यावश्यक बाबींना प्रतिसाद देण्यासाठी सीडीआरआय रोधक पायाभूत सुविधांच्या जलद विकासाला प्रोत्साहन देते.

आयआरआयएसबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

 

S.Bedekar/S.Kakade/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1876836) Visitor Counter : 215