रेल्वे मंत्रालय
भारतीय रेल्वे विभाग भारत गौरव रेल्वेगाडी योजनेतील गाड्यांसाठी केवळ एलएचबी प्रकारच्या डब्यांचा वापर करणार
प्रविष्टि तिथि:
16 NOV 2022 8:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर 2022
रेल्वे गाड्यांसाठी अधिक उत्तम दर्जाचे डबे आणि सुयोग्य प्रवास पॅकेजेस यांच्या माध्यमातून रेल्वे आधारित पर्यटनाला चालना देण्याच्या प्रयत्नांना अधिक बळ देण्याच्या उद्देशाने भारत गौरव रेल्वे योजनेचा आढावा घेण्यात येत आहे.
सुधारित धोरणाची ठळक वैशिष्ट्ये:
- यापुढे, भारत गौरव रेल्वे योजनेतील गाड्यांसाठी केवळ लिंक हॉफमन बुश प्रकारचे डबे वापरण्यात येतील.
- रेल्वे पर्यटनाला आणि भारत गौरव रेल्वे योजनेच्या व्यवहार्यतेला चालना देण्याच्या दृष्टीने केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने या योजनेतील गाड्यांच्या परिचालनासाठी ठराविक आणि बदलत्या मालवाहतूक शुल्कातील अधिकचे घटक लागू न करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे भारत गौरव रेल्वे योजनेअंतर्गत रेल्वे पर्यटनाला देण्यात येणाऱ्या प्रोत्साहनासाठी भारतीय रेल्वे विभागाकडून सुमारे तिकीट शुल्कात 33% सवलत मिळेल.
- ज्या विद्यमान सेवा पुरवठादारांना यापूर्वीच भारत गौरव गाड्यांसाठीच्या धोरणाच्या चौकटीअंतर्गत आयसीएफ प्रकारचे डबे वितरित करण्यात आले असतील त्यांना कराराच्या उर्वरित कालावधीसाठी सुधारित दरांसह एलएचबी प्रकारचे डबे वापरण्याचा पर्याय स्वीकारण्याचा मार्ग खुला आहे. मात्र, जर त्यांनी आधीच देण्यात आलेले डबे वापरण्याचा पर्याय स्वीकारला तर त्यांना सुधारित दराचा फायदा भविष्यकाळातील करारासाठी देण्यात येईल.
- लागू होणारे सुधारित दर अधिसूचित करण्यात आले आहेत.
S.Patil/S.Chitnis/P.Malandkar
(रिलीज़ आईडी: 1876618)
आगंतुक पटल : 201