राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्‍ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या उपस्थितीत भोपाळच्या महिला बचत गटांची परिषद


आर्थिक स्वावलंबन हे महिला सक्षमीकरणाचे प्रभावी माध्यम आहे: राष्ट्रपती मुर्मु

Posted On: 16 NOV 2022 7:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर 2022

राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मु यांनी आज  भोपाळ येथे महिला बचत गटांच्या परिषदेला उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या  की, भारताला स्वावलंबी आणि विकसित राष्ट्र बनवण्यासाठी महिलांचा जास्तीत जास्त सहभाग आवश्यक आहे.  महिलांना मुक्त आणि निर्भय वाटेल आणि ते त्यांच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करू शकतील, असे आपल्याला वातावरण निर्माण करावे लागेल.राष्ट्रपती म्हणाल्यामहिलांनी   एकमेकींना प्रेरणा द्यावी, एकमेकींना मदत करावी, एकमेकींच्या हक्कांसाठी एकत्रितपणे आवाज उठवावा आणि प्रगतीच्या मार्गावर एकत्रितपणे पुढे जावे.  बचत गट हे महिलांना एकत्र आणण्यासाठी आणि त्यांना प्रगतीच्या विविध दिशेने पुढे नेण्यासाठी उत्तम व्यासपीठ असल्याचे त्या म्हणाल्या. महिलांचे सक्षमीकरण करून समाजाची प्रगती व्हावी, या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याने, याचा आपल्याला आनंद  झाला, असे त्यांनी सांगितले. 

राष्ट्रपती म्हणाल्या की , आर्थिक स्वावलंबन हे महिला सक्षमीकरणाचे प्रभावी माध्यम आहे. आर्थिक आणि सामाजिक स्वावलंबन एकमेकांना पूरक आहेत. महिलांच्या स्वावलंबनात बचत गट प्रभावीपणे योगदान देऊ शकतात. त्यांनी नमूद केले कीमध्य प्रदेशात चार लाखांहून अधिक महिला बचत गट सक्रिय आहेत. बचत गटांच्या माध्यमातून महिलांचा अधिकाधिक सहभागच  अर्थव्यवस्था, समाज आणि देश मजबूत करेल, असे त्या म्हणाल्या. महिला बचत गटांची एक   लोकचळवळ बनवण्याची कल्पना स्तुत्य आहे.

राष्ट्रपतींनी नमूद केले कीमहिला जास्तीत जास्त बचत गटांचे नेतृत्व करत आहेत आणि त्यांची उत्पादने भारतात आणि परदेशात विकली जात आहेत. आदिवासी महिलांनी बनवलेली उत्पादने 'ट्रायबल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग डेव्हलपमेंट फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड'  (टीआरआयएफईडी) च्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचत आहेत हे पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला.

राष्ट्रपती म्हणाल्या की, ग्रामीण भागात महिला साक्षरतेचे प्रमाण वाढत आहे ही आनंदाची बाब आहे. आपल्या भगिनी आणि मुली स्वतःचा उदरनिर्वाह करून आर्थिक स्वावलंबन मिळवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. याचा परिणाम ग्रामीण कुटुंबांचे जीवनमान सुधारण्यात होत आहे.

राष्ट्रपती म्हणाल्या की, देशाचा सर्वांगीण विकास आपल्या देशातील महिलांच्या प्रगतीमध्ये आहे. महिलांच्या योगदानामुळे भारत नजीकच्या काळात विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रपतींनी आज सकाळी भोपाळमधील मध्य प्रदेश आदिवासी संग्रहालयाला भेट दिली. या संग्रहालयात आदिवासी संस्कृती, परंपरा, चाली- रीती, चित्रे आणि आदिवासींच्या कलाकृतींचे प्रदर्शन मांडण्‍यात आले आहे.

राष्ट्रपतींचे  भाषण हिंदीत वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करावे.

S.Patil/S.Bedekar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 1876579) Visitor Counter : 180