विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतात उत्पादित वैद्यकीय उपकरणांची किंमत जगात इतरत्र उत्पादित समकक्ष उपकरणांच्या किमतीपेक्षा सुमारे एक तृतीयांश : केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंह

प्रविष्टि तिथि: 15 NOV 2022 7:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 नोव्‍हेंबर 2022

 

जीव रक्षक वैद्यकीय उपकरणे बनविणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांमध्ये भारताचा समावेश आहे, परंतु भारतात उत्पादित झालेल्या उपकरणांची किंमत इतर चार देशांनी उत्पादित केलेल्या उपकरणांच्या सुमारे एक तृतीयांश आहे, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज सांगितले.

थिरूवंतपुरम येथील चित्रा तिरूनाल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड टेक्नॉलॉजी या संस्थेत एकत्रित उपकरण ब्लॉकचे उद्घाटन त्यांनी केले. त्यावेळी ते बोलत होते.

खाजगी उद्योगांची यात समान भागीदारी असेल आणि त्यांनी सुरुवातीपासूनच या प्रकल्पात गुंतवणूक केली तरच अधिक सुकर जीवनासाठी संशोधन आणि विकास यशस्वी होऊ शकेल, असं ते पुढे म्हणाले.

प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना संबोधित करताना डॉ जितेंद्र सिंग म्हणाले, कृत्रिम हृदयाच्या झडपा (वॉल्व), हायड्रोसेफलस शंट, ऑक्सिजनेटर आणि ड्रग एल्युटिंग इंट्रा युटेरिन यंत्र यासारखे अमेरिका, जपान, ब्राझील आणि चीन सारख्या तीन ते चार देशांमध्ये विकसित होणारे तंत्रज्ञान या संस्थेत तयार केले जात आहे.

देशात तयार झालेली जागतिक दर्जाची वैद्यकीय उपकरणे भारतीय रुग्णांना त्यांच्या आयात केलेल्या समकक्ष उपकरणांपेक्षा अंदाजे एक चतुर्थांश ते एक तृतीयांश किमतीत उपलब्ध आहेत, अशी माहिती जितेंद्र सिंह यांनी दिली.  वैद्यकीय उपकरणे तसेच वैद्यकीय व्यवस्थापनात स्वावलंबी होण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या आत्मनिर्भर भारताचा दृष्टीकोन यातून प्रतिबिंबित होतो असे त्यांनी अधोरेखित केले.

पंतप्रधानांनी ग्लोबल हार्मोनायझेशन टास्क फोर्स (जीएचटीएफ) फ्रेमवर्कच्या अनुषंगाने 2017 मध्ये वैद्यकीय उपकरण नियम अधिसूचित केले आणि सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पद्धतींचे पालन केले असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. मेक इन इंडियाच्या मार्गात येणारे नियामक अडथळे दूर करण्याचा प्रयत्न नवीन नियम करतात, रुग्णांची काळजी आणि सुरक्षिततेसाठी उत्तम वैद्यकीय उपकरणे उपलब्ध झाल्यामुळे व्यवसाय करणे सुलभ होते असेही सिंह म्हणाले.

चित्रा इन्स्टिट्यूटमधील एकत्रित उपकरण ब्लॉक हे औषधे आणि वैद्यकीय उपकरणांच्या एककेंद्राभिमुखतेचे उत्तम उदाहरण आहे आणि हे संस्थात्मक असणे आवश्यक आहे. ही संस्था औषधे आणि जैव-औषधांचे एक मॉडेल आहे, ज्याचे अनुकरण आता आयआयटी आणि इतर प्रमुख वैद्यकीय संस्था करत आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

 

* * *

S.Patil/P.Jambhekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1876225) आगंतुक पटल : 192
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil , Telugu