संरक्षण मंत्रालय

सशस्त्र दलांच्या लढाऊ तत्परतेसाठी जलद आणि पारदर्शक निर्णयासह आर्थिक संसाधनांचा विवेकपूर्ण वापर आवश्यक: नवी दिल्लीतील नियंत्रकांच्या परिषदेदरम्यान संरक्षण लेखा विभागाला संरक्षण मंत्र्यांनी केले संबोधित

Posted On: 14 NOV 2022 6:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 नोव्‍हेंबर 2022 

 

जलद आणि पारदर्शक निर्णयादसह आर्थिक संसाधनांचा विवेकपूर्ण वापर सुनिश्चित करणे ही सशस्त्र दलांच्या लढाऊ तत्परतेला बळकटी देण्याची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री  राजनाथ सिंह यांनी केले.  नवी दिल्लीत संरक्षण लेखा विभागाच्या आज म्हणजे 14 नोव्हेंबर 2022 रोजी डीएडीच्या दोन दिवसीय नियंत्रक परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. या विभागाचे अधिकारी संरक्षण वित्त व्यवस्थेचे संरक्षक आहेत. आपल्या वित्तीय विवेकाच्या सहाय्याने मंजूर निधीचे व्यवस्थापन करून ते राष्ट्र उभारणीत आपली महत्वाची भूमिका बजावतात असे राजनाथ सिंह यांनी या अधिकाऱ्यांबद्दल सांगितले.

संरक्षण मंत्रालयाला (एमओडी) मिळालेल्या निधीची व्यवस्था डीएडी पाहते. या अंतर्गत कर्मचार्‍यांचे वेतन आणि भत्ते, निवृत्तीवेतन, विविध खरेदीसाठी आर्थिक सल्ल्यांवर प्रक्रिया करणे आणि प्रथम तसेच तृतीय पक्षाच्या दाव्यांची प्रक्रिया, अंतर्गत लेखापरिक्षण कार्यासह इतर सहाय्यक कामकाजाचा यात समावेश आहे. 

परिषदेच्या प्रमुख मुद्द्यांमध्ये ‘सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन:चेहरा विरहित व्यवहारांच्या प्रणालीकडे; आयएफए प्रणाली: प्रभावी निर्णय घेण्यास मदत;  कार्यक्षमता आणि कामगिरी लेखापरीक्षण: अनुपालन ते आश्वासक चौकट;  सेवा वितरण सुधारणा;  मानव संसाधन व्यवस्थापनातील आव्हाने आणि डीएडीने विकसित केलेली प्रमुख माहिती तंत्रज्ञान प्रणाली टिकवून ठेवणे यांचा समावेश आहे.

सैनिक, निवृत्तीवेतनधारक आणि तृतीय पक्ष आदी लाभार्थ्यांना वेळेवर मानधन सुनिश्चित करण्यावर राजनाथ सिंह यांनी विशेष भर दिला. ‘सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन:चेहरा विरहित व्यवहारांच्या प्रणालीकडे’ या सत्रामुळे संरक्षण आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता येण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. या परिषदेमुळे डीएडीच्या सेवांमध्ये आणखी सुधारणा होईल, त्याच्या कामकाजात पारदर्शकता येईल आणि मानव संसाधन व्यवस्थापन मजबूत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

डीएडीला 275 वर्ष झाल्याच्या स्मरणार्थ एक तिकीट आणि विशेष लिफाफा संरक्षण मंत्र्यांनी यावेळी प्रकाशित केला. उद्घाटन सत्राला संरक्षण दलांचे प्रमुख, लेफ्टनंट जनरल अनिल चौहान, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी, नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार, संरक्षण सचिव गिरीधर अरमाने, सचिव आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

 

* * *

R.Aghor/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1875897) Visitor Counter : 160


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu