माहिती आणि प्रसारण मंत्रालय
इफ्फी 53 च्या प्रतिनिधींचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी गोवा राज्य, उत्सवी वातावरणाचा साज लेवून सज्ज होणार
कला प्रदर्शन केंद्र, सभागृहाबाहेर खुल्या वातावरणात चित्रपटांचे सादरीकरण, आणि इतर बरेच काही, इफ्फी 53 च्या निमित्ताने अनुभवायला मिळणार
#IFFIWood, 13 नोव्हेंबर
जेव्हापासून भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात कायमस्वरूपी भरायला लागला तेव्हापासून गोवा राज्याने या महोत्सवाचे आणि महोत्सवात सहभागी होणाऱ्यांचे खुल्या दिलाने स्वागत केले आहे.
राज्याकडून सर्वांचे एवढ्या प्रेमाने, उत्साहाने आदरातिथ्य केले जाते की प्रत्येक महोत्सवा दरम्यान इथे अनेक उत्कंठावर्धक कार्यक्रम होत राहतात, उपस्थितांसाठी इथे अनेक आकर्षणे असतात. त्यामुळे प्रत्येकाला इथे परत परत यावेसे वाटते. या 53 व्या महोत्सवात,चित्रपटांच्या सादरीकरणा व्यतिरिक्त,मास्टर क्लास आणि चर्चासत्रे सुद्धा होणार आहेत त्याशिवाय इतरही अनेक कार्यक्रम इथे त्यांचा अनुभव घेण्यासाठी, आनंद लुटण्यासाठी आहेत.
फेस्टिवल माईल
अडथळ्यांमधूनही विजयाचा मार्ग प्रशस्त केला जाऊ शकतो, परंतु इफ्फीचा ‘रस्ता’ उत्सवी वातावरणाने प्रशस्त केला जातो. फेस्टिव्हल माईल, किंवा पणजीतील कला अकादमीपासून सुरू होऊन एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा पर्यंत जाणारा रस्ता, आकर्षक कलाकृतींनी सजवण्यात येणार आहे. या कलाकृती, प्रशंसनीय आणि प्रेरणादायक असतील.
या महोत्सवासाठी येणारे प्रतिनिधी आणि वाटसरूना या कलाकृती नक्कीच मंत्रमुग्ध करतील. फेस्टिव्हल माईलमधील खाद्यपदार्थांचे स्टॉलही, पर्यटकांनी, स्थानिकांनी तुडुंब भरलेले असतील. इथल्या स्वादिष्ट अन्नावर यथेच्छ ताव मारून त्यांचा आस्वाद घेण्याची संधी या सर्वांना असेल. या खाद्यपदार्थांची चव चाखून, या सर्व मंडळींचा महोत्सवात वावरण्याचा उत्साह आणखी द्विगुणीत होईल.
Festival Mile
ओपन एअर स्क्रीनिंग
ज्या पर्यटकांनी आणि स्थानिक रहिवाशांनी या महोत्सवासाठी प्रतिनिधी म्हणून नोंदणी केलेली नाही त्यांच्यासाठी ईफ्फी 53 ने एक आव्हानात्मक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. ईफ्फीच्या प्रतिनिधींना चार भिंतींमध्ये (सभागृहात) आनंद देणार्या काही मंत्रमुग्ध करणार्या अविष्कारांचे विनामूल्य सादरीकरण चार भिंतीं बाहेर खुल्या आकाशाखाली करून, ईफ्फी-53,ज्यांनी नोंदणी केलेली नाही त्यांनाही या महोत्सवाचा आनंद काही प्रमाणात लुटण्याची संधी प्राप्त करून देणार आहे.अल्टिन्हो येथील जॉगर्स पार्क, मडगाव येथील रवींद्र भवन आणि मिरामार बीच इथे, ही संधी उपलब्ध असेल. या वेळच्या महोत्सवात अशा प्रकारे आनंद घेतल्यानंतरही, हे आज नोंदणी न केलेले लोक पुढच्या वेळी महोत्सवासाठी नोंदणी केल्याविना राहू शकतील का? हेच ते आव्हान आहे
Joggers Park-Altinho Miramar beach Ravindra Bhavan-Margao
मनोरंजन क्षेत्र
स्क्रिनिंग, चर्चासत्रे आणि दर्जेदार आविष्कार तसेच मास्टर क्लास यामधूनच मनोरंजनाचे खात्रीलायक आश्वासन मिळत असले तरी, अधिकाधिक मजा आणि करमणुकीचा आनंद लुटण्यासाठी, भगवान महावीर चिल्ड्रन पार्क आणि आर्ट पार्क येथे मनोरंजन क्षेत्र स्थापन केली जातील. ही मनोरंजन क्षेत्र, संपूर्ण महोत्सवाच्या काळात, नोंदणीकृत प्रतिनिधी आणि नोंदणी न केलेले प्रतिनिधी अशा दोघांसाठीही खुली असतील. दोन्ही ठिकाणी प्रत्यक्ष आविष्कार, कला प्रदर्शन केंद्र आणि अर्थातच खाद्यपदार्थांचे स्टॉल्स असतील.
Bhagwan Mahavir Children’s Park Art Park
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाविषयी
1952 मध्ये सुरू झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी), आशियातील सर्वात प्रमुख चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे.
चित्रपटांचा मनमुराद आनंद घेणे,त्यांनी सांगितलेल्या कथा आणि त्यांच्यामागील व्यक्तिरेखा यांना समजून घेणे ही या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामागची कल्पना आहे. याद्वारे आपण चित्रपटांबद्दलची प्रशंसा आणि उत्कट प्रेमाचा व्यापक आणि सखोल प्रसार, प्रोत्साहन आणि जोपासना करू शकू. यातून लोकांमध्ये प्रेमाचा सेतू आणि परस्परांना समजून घेत, त्यांना वैयक्तिक आणि सामूहिक उत्कृष्टतेची नवीन शिखरे गाठण्यासाठी प्रेरणाही मिळेल.
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे, एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा आणि या महोत्सवाचं आयोजन करणारे गोवा सरकार यांच्या सहकार्याने दरवर्षी हा महोत्सव आयोजित केला जातो.
53 व्या इफ्फी महोत्सवा संबंधित सर्व माहिती आणि ताज्या घडामोडी www.iffigoa.org या महोत्सवाच्या संकेतस्थळावर आणि पत्र सूचना कार्यालयाच्या (pib.gov.in) या संकेतस्थळावर तसेच इफ्फीच्या ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंट्स वरती आणि पीआयबी गोवाच्या सोशल मीडिया हँडलवर देखील मिळू शकते.
चला, या चित्रपट महोत्सव सोहळ्यासंदर्भात जाणून घेत राहूया आणि आनंद लुटत राहूया.
***
N.Chitale/A.Save/P.Kor
Follow us on Social Media:@PIBPanaji /PIBPanaji /pib_goa pibgoa[at]gmail[dot]com /PIBGoa
(Release ID: 1875639)
Visitor Counter : 284