राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी भुवनेश्वरमध्ये विविध शैक्षणिक प्रकल्पांचा केला प्रारंभ शाळा आणि वसतिगृहाला भेट देवून राष्ट्रपतींनी आपल्या स्मृतींना दिला उजाळा
Posted On:
11 NOV 2022 4:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर 2022
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी आज (११ नोव्हेंबर २०२२) भुवनेश्वर येथील जयदेव भवन येथे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या विविध शैक्षणिक प्रकल्पांचा प्रारंभ केला. यामध्ये ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) च्या उडिया भाषेतील अभियांत्रिकी पुस्तकांचा समावेश आहे. ‘कमिशन फॉर सायंटिफिक अँड टेक्निकल टर्मिनॉलॉजी (सीएसटीटी) द्वारे विकसित केलेल्या उडिया भाषेतील तांत्रिक संज्ञांचा शब्दकोष आणि ई-कुंभ (नॉलेज अनलीश्ड इन मल्टी भारतीय लँग्वेजस्) नावाचे पोर्टल सुरू केले.
याप्रसंगी बोलताना राष्ट्रपती मुर्मु म्हणाल्या की, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या या महत्त्वाच्या उपक्रमांचा प्रारंभ करताना मला आनंद होत आहे. सर्वांसाठी शिक्षण सुलभ करण्याच्या दिशेने उचललेले हे स्तुत्य पाऊल आहे. अनेक विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण इंग्रजीतून समजण्यात अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले आहे. म्हणूनच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 अंतर्गत प्रादेशिक भाषांमध्ये तांत्रिक शिक्षण देण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत.
राष्ट्रपती म्हणाल्या की, मातृभाषा विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला मदत करते, यात शंका नाही. मातृभाषेतून शिक्षण घेतल्याने विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशील विचार आणि विश्लेषणात्मक कौशल्ये विकसित होतील आणि त्यामुळे शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पूर्वी प्रादेशिक भाषांमध्ये पाठ्यपुस्तके उपलब्ध नसल्यामुळे प्रादेशिक भाषांमधून तांत्रिक शिक्षण देताना आणि घेतानाही अडथळे येत होते, असे त्यांनी नमूद केले. ही अडचण एआयसीटीईने दूर करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल एआयसीटीईचे राष्ट्रपतींनी कौतुक केले.
त्यापूर्वी आज सकाळी राष्ट्रपती मुर्मु यांनी तपोबन प्रशालेला भेट दिली. तसेच त्यांनी आपली बालपणीची शाळा आणि वसतिगृहाला भेट दिली. ‘गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूल युनिट-दोन’ आणि ‘कुंतला कुमारी सबत आदिवासी मुलींच्या वसतिगृह युनिट-दोन’ भेट दिली. या शाळेत द्रौपदी मुर्मु काही काळ शिकल्या होत्या. तसेच या वसतिगृहात त्या निवास करीत होत्या. राष्ट्रपतींनी वसतिगृहातील विद्यार्थी, शिक्षक, माजी विद्यार्थी यांच्याबरोबर संवादही साधला.
* * *
S.Patil/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1875231)
Visitor Counter : 237