पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाच्या सचिवांनी कॉप 27 परिषदेतील भारतीय दालनात "शाश्वत जीवनासाठी तंत्रज्ञानाच्या मूल्यमापनाची आवश्यकता" या विषयावरील पॅनेल चर्चेत सहभाग घेतला.


तंत्रज्ञान केवळ मोठ्या उद्योगांपुरते मर्यादित राहू शकत नाही - सूक्ष्म, लघु आणि माध्यम उद्योग तसेच स्टार्ट अप्स ना तंत्रज्ञानाचा उत्तम प्रकारे वापर करता यावा यासाठी त्यांना वित्तीयदृष्ट्या सक्षम करणे आवश्यक आहे - केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालय, सचिव

Posted On: 11 NOV 2022 3:00AM by PIB Mumbai

भविष्यातील जागतिक नागरिकांच्या  शाश्वत कल्याणासाठी तंत्रज्ञानाच्या गरजा आणि त्या अंगिकारण्याच्या दृष्टीने  त्यांचे मूल्यांकन करण्याच्या उद्देशाने विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने कॉप 27 परिषदेत  भारतीय दालनात, "शाश्वत जीवनासाठी तंत्रज्ञानाच्या  मूल्यमापनाची  आवश्यकता" या विषयावरील पॅनेल चर्चासत्राचे आयोजन केले होते. भारतासह संपूर्ण जगाला आज तंत्रज्ञान हवे आहे, जे कार्बन उत्सर्जन करतात असे आढळून येते, केवळ त्यांच्यापुरती हवामान बदल ही समस्या मर्यादित नाही, हवामान बदल हे आपल्या इच्छेवर अवलंबून नसून ते आपल्या उंबरठ्यापर्यंत आले आहे, याची जाणीव आता मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे, असे केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल सचिव  लीना नंदन चर्चेत बोलताना म्हणाल्या.

हवामान बदलामुळे मानवाला अनेक नैसर्गिक आपत्तींना  तोंड द्यावे लागत आहे, आपल्याला भेडसावणाऱ्या आव्हानांनुसार सर्वाना जीवनशैलीत परिवर्तन करावे लागेल असे लीना नंदन यांनी  सांगितले. आपल्याला कोणते उद्दिष्ट साध्य करायचे आहे आणि ते कसे साध्य करायचे आहे, यामधील तफावत भरून काढण्याला  आपल्या चर्चेत प्राधान्य द्यायला हवे, असे त्या म्हणाल्या. विज्ञान तर आहेच पण ते विज्ञान आणि ज्ञान उपयोगात, व्यवहारात कसे आणायचे यावर कार्य केले पाहिजे, बांधकाम क्षेत्रातील तंत्रज्ञानाविषयी बोलताना नंदन यांनी सांगितले की एकाच मापात सर्व काही बसू शकत नाही, कारण भारत हा वैविध्यपूर्ण देश आहे, वेगवेगळ्या राज्यांसाठी तंत्रज्ञानाच्या गरजांचे मूल्यांकन वेगळे असते. भूप्रदेशातील विविधता प्रत्येक राज्यांना त्यांच्याशी निगडित समस्यांचे  संबंधित उपाय शोधण्यास भाग पाडते, असे त्या म्हणाल्या.  वापर कमी करा, एकदा वापरलेले पुन्हा वापरा, त्यावर प्रक्रिया  करा, पुनर्संचयित करा आणि पुन्हा  नूतनीकरण करा. या सर्व R (Reduce, reuse, recycle, restore and refurbish) ना  तंत्रज्ञानाची जोड हवी असे त्यांनी  चक्राकार   अर्थव्यवस्थेबद्दल बोलताना सांगितले. नाविन्यपूर्ण उपाय शोधण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने  राज्य सरकारांशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.

तंत्रज्ञान केवळ मोठ्या उद्योगांपुरते मर्यादित राहू शकत नाही  - सूक्ष्म, लघु आणि माध्यम उद्योग तसेच स्टार्ट अप्स ना तंत्रज्ञानाचा  उत्तम प्रकारे वापर करता यावा यासाठी  त्यांना वित्तीयदृष्ट्या सक्षम करणे आवश्यक आहे असेही   लीना नंदन म्हणाल्या.

तंत्रज्ञान  माहिती , अंदाज आणि  मूल्यांकन परिषद् (TIFAC) चे कार्यकारी संचालक प्रा. प्रदीप श्रीवास्तव यांनी TIFAC च्या कार्बन उत्सर्जन कमी करण्याविषयीच्या  उपक्रमांबद्दल माहिती दिली. तंत्रज्ञान विकास मंडळ (TDB) चे सचिव  डॉ.राजेश कृ. पाठक, यांनी तंत्रज्ञान हस्तांतरण आणि व्यापारीकरण याविषयी सांगितले. हवामान तंत्रज्ञान केंद्र आणि नेटवर्क (CTCN) चे  डॉ. राजीव गर्ग,  यांनी कार्यक्रमात तंत्रज्ञान हस्तांतरण यंत्रणेबद्दल सांगितले.  विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या हवामान बदल कार्यक्रम  (CCP) सल्लागार आणि प्रमुख, डॉ. निशा मेंदिरट्टा   या चर्चेदरम्यान उपस्थित होत्या.

पार्श्वभूमी

हवामान बदल हा जागतिक स्तरावर चिंतेचा विषय असून अनेक राष्ट्राने हवामान बदलाच्या विपरीत परिणामांना कमी करण्यासाठी कृती करत आहेत. हवामान बदलावरील आंतर सरकारी पॅनलने  (IPCC) ने त्यांच्या 6 व्या मूल्यांकन अहवालात (9 ऑगस्ट, 2021) असे निरीक्षण नोंदवले आहे की हवामान बदल व्यापक, जलद आणि तीव्र गतीने होत आहे आणि सर्व देशांनी गंभीर प्रयत्न न केल्यास 2040 पर्यंत ते 1.5o अशी   सीमारेषा  ओलांडू शकते.

संबंधित हितसंबंधींसाठी आवश्यक तंत्रज्ञानाच्या गरजा ओळखण्याच्या उद्देशाने  विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (DST) ने , तंत्रज्ञान माहिती, अंदाज आणि मूल्यमापन परिषद (TIFAC) च्या संयुक्त विद्यमाने, (LiFE- Lifestyle for Environment) पर्यावरणस्नेही  जीवनशैली या संकल्पनेवर आधारीत पॅनेल चर्चा आयोजित केली होती. यामध्ये शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील तज्ञ,  विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (DST)चे  आणि तंत्रज्ञान माहिती, अंदाज आणि मूल्यमापन परिषद  (TIFAC) चे शास्त्रज्ञ सहभागी झाले होते. सर्व  क्षेत्रातील भारतामधील  सर्वोत्तम पद्धतींचे प्रदर्शनही यावेळी आंतरराष्ट्रीय समुदायासमोर  करण्यात आले.

***

Jaydevi PS/B.Sontakke.CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1875125) Visitor Counter : 187


Read this release in: Telugu , English , Urdu , Hindi , Tamil