संरक्षण मंत्रालय
भारतीय लष्कराने वीर नारींच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या तक्रारींच्या निवारणासाठी "वीरांगना सेवा केंद्र" नावाची एक खिडकी सुविधा केली सुरू
Posted On:
10 NOV 2022 6:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर 2022
तंत्रज्ञानाचा उपयोग करत आणखी एक पाऊल टाकत, भारतीय लष्कराने वीर नारींच्या कल्याणासाठी आणि तक्रारींचे निवारण करण्यासाठी "वीरांगना सेवा केंद्र" (व्हीएसके) नावाची एक खिडकी (सिंगल विंडो) सुविधा सुरू केली आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन आज आर्मी वाइव्ह्स वेल्फेअर असोसिएशन (एडब्लूडब्लूए)च्या अध्यक्षांच्या हस्ते दिल्ली कॅंटोन्मेंट येथे असलेल्या इंडियन आर्मी वेटरन्स डायरेक्टरेट ऑफ इंडिया (डीआयएव्ही) च्या आवारात करण्यात आले.
वीरांगना सेवा केंद्र (व्हीएसके) भारतीय लष्कराच्या वेटरन्स पोर्टल www.indianarmyveterans.gov.in वर सेवा म्हणून उपलब्ध असेल. ही प्रणाली तक्रार नोंदणीसोबतच ट्रॅकिंग, मॉनिटरिंग आणि अर्जदाराला नियमित माहिती पुरवते. व्हीएसकेशी संपर्क साधण्यासाठी वीरनारीला / जवळच्या नातेवाईकाला दूरध्वनी, एसएमएस, व्हॉट्सअॅप, टपाल, ई-मेल अशी अनेक साधने असतील आणि मदतीसाठी प्रत्यक्ष संपर्कही साधता येईल. तक्रारकर्ते ग्राहक संबंध व्यवस्थापन (सीआरएम) सॉफ्टवेअरद्वारे संबंधित तक्रार निवारण कोणत्या स्थितीत आहे हे पाहू शकतात आणि अर्जदाराला एसएमएस आणि ईमेलद्वारे त्यांची सद्यस्थिती नियमितपणे कळेल अशी व्यवस्था आहे.
* * *
S.Kakade/P.Jambhekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1875005)
Visitor Counter : 217