आयुष मंत्रालय
आयएमपीसीएल कंपनीने नफ्यात प्रभावी अशी तिप्पट वाढ नोंदवत आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 45.41 कोटी रुपयांचा नफा कमविला
कंपनीतर्फे केंद्रीय आयुष मंत्रालयाला 9.93 कोटी रुपयांचा लाभांश प्रदान करण्यात आला
Posted On:
10 NOV 2022 3:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर 2022
आयएमपीसीएल अर्थात इंडियन मेडिसिन फार्मास्यूटिकल्स कोर्पोरेशन या भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या अखत्यारीतील सार्वजनिक उपक्रमाने त्यांचे भागधारक असलेले आयुष मंत्रालय आणि उत्तराखंड राज्य सरकार यांना 10.13 कोटी रुपयांचा लाभांश देत असल्याची घोषणा केली आहे. नवी दिल्ली येथील वाहतूक भवनात आज आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमादरम्यान केंद्रीय आयुष मंत्रालयाला देण्यात येणाऱ्या 9.93 कोटी रुपयांच्या लाभांशाचा धनादेश केंद्रीय आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल म्हणाले, “गेल्या आर्थिक वर्ष 2020-21 मधील नफ्याच्या तुलनेत आयएमपीसीएलने यावर्षी अत्यंत आकर्षक नफा कमविला असून ही अत्यंत प्रशंसनीय कामगिरी आहे.”
या लाभांश धनादेश हस्तांतरण कार्यक्रमामध्ये केंद्रीय आयुष राज्यमंत्री मुंजपारा महेंद्रभाई, आयुष मंत्रालयाचे विशेष सचिव प्रमोद कुमार पाठक, आयुष मंत्रालयातील योग आणि निसर्गोपचार विभागाचे संचालक विक्रम सिंग, आयुर्वेद विषयाचे सल्लागार आणि आयएमपीसीएलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.मुकेश कुमार तसेच आयएमपीसीएलचे सहाय्यक महाव्यवस्थापक (एफअँडए) अरविंदकुमार अग्रवाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आयएमपीसीएल या कंपनीला भारत सरकारतर्फे मिनी भारतरत्न श्रेणी 2 ने गौरविण्यात आले असून कंपनीला आयएसओ 9001:2015 हे मानांकन देखील मिळाले आहे. सद्यस्थितीत या कंपनीतर्फे विविध आजारांवर उपचार करण्यासाठी 657 प्राचीन आयुर्वेदिक, 332 युनानी आणि 71 मालकीहक्कप्राप्त आयुर्वेदिक औषधांची निर्मिती केली जाते. ही कंपनी, राष्ट्रीय आयुष अभियानाअंतर्गत देशातील सर्व राज्यांना तसेच 6000 जनौषधी केंद्रांना आयुर्वेदिक तसेच युनानी औषधांचा पुरवठा करते.
* * *
S.Tupe/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1874953)
Visitor Counter : 154