संरक्षण मंत्रालय

मेरीटाईम हिस्ट्री सोसायटीच्यावतीने 15 नोव्हेंबर 2022 रोजी आयटीएस 43 व्या वार्षिक चर्चासत्राचे आयोजन


संकल्पना : भारताच्या सागरी शक्तीच्या वाटचालीचा शोध

Posted On: 09 NOV 2022 11:40AM by PIB Mumbai

 मेरीटाईम हिस्ट्री सोसायटी येत्या 15 नोव्हेंबर 2022 रोजी मुंबईतील  कुलाबा येथील आय एन एच एस अश्विनीच्या  अगस्त्य सभागृहात आयटीएस 43 व्या वार्षिक चर्चासत्राचे आयोजन करत आहे.

दिवसभर चालणार्‍या या चर्चासत्राची मुख्य संकल्पना “भारताच्या सागरी शक्तीच्या वाटचालीचा शोध” अशी आहे. 7500 किलोमीटर पेक्षा जास्त किनारपट्टी लाभलेल्या भारताने प्रागैतिहासिक काळापासून समुद्र हे उपजीविकेचे, अन्वेषणाचे तसेच विविध भूभागाना जोडणारे  माध्यम असल्याचे अनुभवले आहे.

 या चर्चासत्रात भारतातील ऐतिहासिक उत्क्रांती आणि सागरी शक्तीच्या वापर यासंदर्भात 10 विविध विषयांवर सादरीकरण  आणि त्यावर चर्चा होईल . कमोडोर (डॉ) श्रीकांत केसनूर (निवृत्त), प्रमोद कपूर, कॅप्टन राघवेंद्र मिश्रा (निवृत्त), कॅप्टन एम दोराईबाबू, कॅप्टन हिमाद्री दास, कमांडर निनाद फातर्फेकर (निवृत्त), कमांडर कलेश मोहनन, कमांडर आरएस सावान, जान्हवी लोकेगावकर आणि डेनार्ड डिसोझा आदि  या चर्चासत्रातील वक्ते आणि  सत्र  संवादक म्हणीन सहभागी असणार आहेत. 

या चर्चासत्रातील विविध सत्रांच्या ऐतिहासिक अढाव्याच्या माध्यमातून सहभागींची उद्बोधन होण्याबरोबरच  शाश्वत सागरी परिसंस्था ,सिद्धांत, एकीकृत सागरी धोरणे आणि सर्वसमावेशक राष्ट्रीय सागरी विकास योजना स्थापन करण्यासाठी ही चर्चा  उपयुक्त ठरू शकेल

सागरी परीसंस्थेबाबत कुतुहूल  असलेल्या सर्व संबंधिताना 15 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 0930 ते 1630 या  दरम्यान होणाऱ्या चर्चासत्रात उपस्थित राहण्यासाठी  मेरीटाईम हिस्ट्री सोसायटी आमंत्रित करत आहे. प्रवेशाचे अधिकार राखीव आहेत. नोंदणी तपशीलांसाठी, ops@mhsindia.org वर स्वारस्य व्यक्त करणारा ईमेल पाठवावा.

***

Jaydevi PS/SM/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1874689) Visitor Counter : 161


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu