कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, उद्या नवी दिल्ली इथल्या विज्ञान भवनात आयोजित “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: माहिती अधिकाराच्या माध्यमातून लोक केंद्रित प्रशासन” या विषयावरील केंद्रीय माहिती आयोगाच्या वार्षिक अधिवेशनाचे करणार उद्घाटन
प्रविष्टि तिथि:
08 NOV 2022 4:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 नोव्हेंबर 2022
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला उद्या नवी दिल्ली इथल्या विज्ञान भवनात आयोजित “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: माहिती अधिकाराच्या (आरटीआय) माध्यमातून लोक केंद्रित प्रशासन” या विषयावरच्या केंद्रीय माहिती आयोगाच्या वार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन करतील.
केंद्रीय माहिती आयोग दर वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान वार्षिक अधिवेशन आयोजित करते. हे अधिवेशन केवळ भागधारकांना पारदर्शकता, प्रशासन, माहितीचा अधिकार आणि अन्य संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आणि एकत्र येण्यासाठी संधी आणि मंच उपलब्ध करत नाही, तर माहिती अधिकार (आरटीआय) कायद्याची कक्षा रुंदावण्यामध्ये आणि खोलवर रुजवण्यामध्ये लक्षणीय योगदान देते. या अधिवेशनाला केंद्रीय सार्वजनिक माहिती अधिकारी आणि सार्वजनिक प्राधिकरणाच्या विभागीय प्रथम अपीलीय अधिकाऱ्यांसह, मुख्य माहिती आयुक्त, राज्य माहिती आयुक्तालयाचे माहिती आयुक्त आणि अन्य मान्यवर आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहतील.
* * *
N.Chitale/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1874489)
आगंतुक पटल : 226