आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

जम्मू आणि काश्मीर मधील विविध सरकारी रुग्णालयांना डिप्लोमेट ऑफ नॅशनल बोर्ड (डीएनबी) च्या वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या 265 जागा द्यायला भारत सरकारची मंजुरी


पहिल्या टप्प्यात 20 जिल्ह्यांमध्ये 250 पदव्युत्तर (पीजी) अभ्यासक्रमाच्या जागांचे केले वाटप

स्थानिक सेवेतील डॉक्टरांच्या पदव्युत्तर प्रशिक्षणासाठी 50% पीजी च्या जागा राखीव ठेवण्यात आल्या

Posted On: 08 NOV 2022 12:01PM by PIB Mumbai

देशभरातील आरोग्य सेवेच्या वितरणात सुधारणा करण्याच्या उद्देशाने "सर्वांसाठी आरोग्य" या पंतप्रधानांच्या संकल्पनेला अनुसरून, एक महत्वाचे पाऊल म्हणून, भारत सरकारने जम्मू आणि काश्मीरच्या 20 जिल्ह्यांमधल्या अनेक सरकारी रुग्णालयांना केंद्रीय वैद्यकीय परीक्षा मंडळाच्या (एनबीईएमएस) च्या सक्रीय योगदानासह, 265 डिप्लोमेट ऑफ नॅशनल बोर्ड (डीएनबी) च्या पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा मंजूर केल्या आहेत.

या महत्वाच्या पावलामुळे केवळ जम्मू आणि काश्मीरच्या लोकांना फायदा होणार नाही, तर जम्मू आणि काश्मीरमधील डॉक्टर्सना देखील त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रशिक्षित होण्याची संधीही मिळेल. स्थानिक पातळीवरच्या या प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीने केंद्रशासित प्रदेशात प्रभावी आरोग्य सेवा वितरण प्रणाली निर्माण व्हायला मदत होईल.  

जम्मू आणि काश्मीरच्या जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षित तज्ञ पुरवण्याच्या उद्देशाने, भारत सरकारने हे आव्हान मिशन मोडमध्ये स्वीकारले आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने एनबीईएमएस च्या सहकार्याने यासाठी पुढाकार घेतला असून, एनबीईएमएस च्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अनेक जागा जम्मू आणि काश्मीरमधील अनेक रुग्णालयांना मिळतील, हे सुनिश्चित केले आहे.   

परिणामी, या विस्तार योजनेच्या पहिल्या टप्प्यात, सध्या 20 जिल्ह्यांमध्ये 250 पेक्षा जास्त पीजी च्या जागा उपलब्ध आहेत. दुसर्‍या टप्प्यात आणखी दोन पीजी च्या जागा मंजूर केल्या जातील.  त्याशिवाय, पीजी च्या जागांपैकी 50% जागा स्थानिक सेवेतील डॉक्टरांसाठी राखीव ठेवल्या आहेत, ज्यामुळे त्यांना पदव्युत्तर प्रशिक्षणाची संधी मिळेल.

जवळजवळ सर्व जिल्ह्यांमध्ये, अधिक परवडण्याजोगी आधुनिक आणि चांगल्या दर्जाची आरोग्य सुविधा सहज उपलब्ध होणार असल्यामुळे, जम्मू आणि काश्मीरच्या लोकांना त्याचा फायदा होईल. त्यामुळे प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय सेवेची गुणवत्ता आणखी सुधारेल.

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विविध प्रवेश परीक्षांसाठी भारत सरकारने केंद्रशासित प्रदेशातील  परीक्षा केंद्रांची संख्या वाढवली आहे, त्यामुळे जम्मू काश्मीरमधल्या परीक्षार्थी उमेदवारांना प्रवेश परीक्षा देण्यासाठी अन्य राज्यात जावे लागणार नाही.

जम्मू आणि काश्मीर मधील सरकारी रुग्णालये/वैद्यकीय महाविद्यालयांमधील एनबीईएमएस मान्यताप्राप्त जागांची यादी पुढील प्रमाणे आहे: 

 

 

* * *

Ankush C/R.Agashe/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1874451) Visitor Counter : 117


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu