माहिती आणि प्रसारण मंत्रालय

ऑस्ट्रियन चित्रपट अल्मा आणि ऑस्कर करणार इफ्फी (IFFI) 53 ची आश्वासक सुरुवात


ऑस्ट्रियन दिग्दर्शक डायटर बर्नर यांच्या अल्मा आणि ऑस्कर या चित्रपटांनी होणार इफ्फी (IFFI) 53 ची दिमाखदार सुरुवात

Posted On: 08 NOV 2022 11:08AM by PIB Mumbai

53 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) 20 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर दरम्यान गोव्यात होणार आहे. या महोत्सवाची सुरुवात, अल्मा आणि ऑस्कर या ऑस्ट्रियन चित्रपटांच्या प्रदर्शनाने होईल. व्हिएनीज समाजात प्रतिष्ठित असलेली महिला अल्मा महलर (1879-1964) आणि ऑस्ट्रियन कलाकार ऑस्कर कोकोस्का (1886-1980) यांच्यातील उत्कट आणि तरल  नातेसंबंध हा या चरित्रपटाचा विषय आहे. डायटर बर्नर दिग्दर्शित हा चित्रपट एकूण 110 मिनिटे कालावधीचा आहे.

संगीतकार आणि कलाकार यांच्यातील प्रेमसंबंध उलगडणाऱ्या चित्रपटाने सिनेमा या कलाप्रकाराचा उत्सव साजरा करणाऱ्या इफ्फी 53 ची सुरुवात होणं, अगदी समर्पक आहे.

ऑस्कर कोकोस्का ही एक उदयोन्मुख चित्रकार आहे. तिचा पहिला नवरा गुस्ताव महलरच्या मृत्यूनंतर, वास्तुविशारद वॉल्टर ग्रोपियस याच्याशी तिचे संबंध सुरू झाले असताना, ती अल्मा एका संगीत संयोजकाच्या संपर्कात येते. आपल्या मधील कलाकाराला स्वतःची ओळख मिळणार नाही, अशा दुसऱ्या एका पुरुषाबरोबर राहायचं नसल्यामुळे अल्मा, ऑस्कर कोकोस्काबरोबर एक ज्वलंत प्रेमसंबंध सुरू करते. त्यांच्या नातेसंबंधांचं स्वरूप असं आहे, की कोकोस्का, त्याच्यावर आधारित आपली सर्वात प्रसिद्ध कलाकृती चित्रित करतो. हा चित्रपट त्यांच्या नात्याचा वेध घेतो, ज्याचं वर्णन ‘वादळी’ आणि ‘तरल’ असं केलं आहे.  

दिग्दर्शक डायटर बर्नर हे प्रसिद्ध ऑस्ट्रियन चित्रपट आणि नाट्य दिग्दर्शक, अभिनेता आणि पटकथा लेखक आहेत. 1976-1980 या काळात चाललेल्या, अल्पेनसागा या कौटुंबिक आणि ग्रामीण पार्श्वभूमीवरच्या सहा पुरस्कार विजेत्या चित्रपटांनी त्यांना ऑस्ट्रियामध्ये दिग्दर्शक म्हणून ओळख मिळाली. स्नित्झलर यांच्या, डेर रीन या नाटकावर  आधारित  बर्लिनर रेगेन (2006) या त्यांच्या चित्रपटामुळे ते आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसेचे मानकरी ठरले.

अल्मा आणि ऑस्कर हे चित्रपट प्रदर्शन रविवार, 20 नोव्हेंबर रोजी INOX, पणजी येथे प्रदर्शित करण्याचं नियोजन आहे.    

*****

Ankush C/R Agashe /CYadav 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1874436) Visitor Counter : 212