रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मध्य प्रदेशात जबलपूर येथे 4054 कोटी रुपयांच्या आठ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन
Posted On:
07 NOV 2022 6:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 नोव्हेंबर 2022
उत्कृष्ट रस्ते निर्मितीच्या माध्यमातून मध्य प्रदेशच्या प्रगतीला नवी प्रेरणा देणाऱ्या 4,054 कोटी रुपयांच्या आणि 214 किमी लांबीच्या 8 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे आज मध्य प्रदेश मधील जबलपूर येथे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उदघाटन झाले. हिरण नदी ते सिंगूर नदीपर्यंत 53 किमी आणि नौरादेही वन्यजीव अभयारण्याच्या 12 किमी लांबीच्या चौपदरी बांधकामामुळे जबलपूर ते भोपाळ प्रवासाचा वेळ दोन तासांनी वाचेल, असे गडकरी म्हणाले. ऊस आणि डाळींचे सर्वात मोठे उत्पादक असलेल्या नरसिंगपूर येथील शेतकरी त्यांचे धान्य माळवा आणि मध्य प्रदेशातील मंडईत नेऊ शकतील. यासोबतच वन्यजीव अभयारण्यात प्राण्यांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी 23 अंडरपास आणि 5 छोटे पूल बांधले जात आहेत, असेही ते म्हणाले.
यावेळी भारतमाला प्रकल्पांतर्गत 3600 कोटी रुपये खर्चाच्या 112 किमी, लांबीच्या चौपदरी जबलपूर रिंगरोडची पायाभरणी करण्यात आली.
N.Chitale/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1874316)
Visitor Counter : 200