खाण मंत्रालय
आतापर्यंत 622 जिल्ह्यांमध्ये जिल्हा खनिज फाउंडेशनची स्थापना
प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेंतर्गत 2,52,995 प्रकल्प मंजूर
Posted On:
07 NOV 2022 2:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 नोव्हेंबर 2022
खाण मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतातील 23 राज्यांमधील 622 जिल्ह्यांमध्ये जिल्हा खनिज फाउंडेशनची (डीएमएफ) स्थापना करण्यात आली आहे. खाण आणि खनिजे (विकास आणि नियमन) एमएमडीआर कायदा, 1957 मध्ये सुधारणा करून जिल्हा खनिज फाउंडेशनची संकल्पना मांडण्यात आली. सुधारित कायद्याने, इतर बाबींमध्ये कलम 9 ब लागू केले, यामुळे खाण संबंधित कार्यांमुळे प्रभावित झालेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा खनिज फाउंडेशनची, ना-नफा संस्था म्हणून ट्रस्टची स्थापना करण्याची तरतूद करण्यात आली. खाणकामामुळे प्रभावित झालेल्या लोकांच्या आणि क्षेत्रांच्या हितासाठी आणि फायद्यासाठी काम करणे हे या फाउंडेशनचे उद्दिष्ट आहे.
जिल्हा खनिज फाउंडेशन अंतर्गत जमा झालेल्या निधीतून प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना (पीएमकेकेकेवाय) राबविण्यात येत आहे. या वर्षी सप्टेंबरपर्यंत, 63534.07 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले असून 37422.94 कोटी रुपये खर्च झाले आहेत. या योजनेअंतर्गत मंजूर 2,52,995 प्रकल्पांपैकी 1,33,144 प्रकल्प आतापर्यंत पूर्ण झाले आहेत.
S.Tupe/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1874235)
Visitor Counter : 175